दहा वर्षापासून 'हे' कुटुंब शेतामधील मातीतूनच साकारतात गणपती

संदीप गाडवे | Saturday, 22 August 2020

जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथील कुंदा प्रकाश दळवी आपल्या शेतातील माती आणून आपल्या हाताने या गेल्या १० वर्षांपासून स्वतः च्या हाताने गणेशाची मूर्ती तयार करतात.

केळघर (सातारा) : खरं तर गणपती बाप्पा हे साऱ्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आहे. श्रीमंत असो व गरीब आपापल्या परीने श्री. गणेशाची भक्ती करत असतात. गणेश चतुर्थी दिवशी श्री. गणेशाच्या मूर्तीची घरोघरी स्थापना केली जाते. यंदा कोरोनाचे सावट गणेशोस्तवर आहे. जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथील कुंदा प्रकाश दळवी या गेल्या १० वर्षांपासून स्वतः च्या हाताने गणेशाची मूर्ती तयार करतात.

आपल्या शेतातील माती आणून आपल्या हाताने त्या गणेश मूर्ती तयार करतात. या मूर्तीला त्या रंग देतात. तसेच दरवर्षी गणेश चतुर्थी दिवशी त्या आपल्या हाताने बनवलेल्या गणपतीची पूजा करून आपल्या घरात या श्री गणेशाची प्रतिष्ठापना देखील मोठ्या भक्ती भावाने करतात. त्यांच्या अंगणात सुद्धा गणपती मंदीर आहे. सुरवातीला तिथे त्यांनी दगडावर गणपती कोरला होता, त्याच गणपतीचे प्रतिष्ठापना करून कायमस्वरूपीचे मंदिर सुद्धा बांधले आहे.

अशा पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून कुंदा दळवी यांनी अनोखा सामाजिक संदेश दिला असून स्त्रिया कुठल्याच गोष्टीत मागे नसून स्त्रियांमध्ये ही एक कलाकार लपलेला असतो हा दाखलाच दिला आहे.

संपादन -  सुस्मिता वडतिले