शेतकऱ्यांवर आर्थिक संकट, फुलांच्या मागणीत मोठी घट!

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट, फुलांच्या मागणीत मोठी घट!

उंडाळे (जि. सातारा) : वातावरणातील बदल, मंदिरे बंद असल्याने मेटाकुटीला आलेल्या फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अगोदर पितृ पंधरवडा आणि अधिक मासाचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर फुलवलेली झेंडूच्या बागेतील फुले उकिरड्यात टाकण्याची वेळ आली आहे. फुलशेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. 

जून महिन्यात झेंडूची रोपे आणून त्याची लागवड केली. आंतरपीक म्हणून घेवडा घेतला, पण अतिपावसामुळे घेवडा पूर्ण कुजून गेला आहे. दुसरे पीक झेंडूची बाग कशी चांगली येईल, यासाठी शेतकऱ्यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले. पावसामुळे पिकावर तांबेरा, करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध औषध फवारणी करत अतिकष्टाने झेंडूची बाग फुलवली. त्याला योग्य प्रकारे खते देऊन बागेला झोकात आणले. पण, कोरोना महामारीच्या संकटात सण-उत्सव साजरे करण्यावर मर्यादा, गेलेला पितृपंधरवडा, सुरू झालेला अधिक मास, मंदिरे बंद त्यामुळे फुलांना पाहिजे अशी मागणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर झेंडूची फुले उकिरड्यात फेकण्याची वेळ आली आहे.

फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. दरम्यान, जूनमध्ये दहा गुंठे क्षेत्रात झेंडूची बाग घेतली. त्यासाठी तीन हजार रुपयांची रोपे घेतली. औषध फवारणी, खतासाठी आठ हजार रुपये खर्च करून बाग झोकात आणली. फुले लागल्यापासून आजपर्यंत पाहिजे अशी मागणी नाही. त्यात गेलेला पितृपंधरवडा, अधिक मासाची भर पडली आहे. आधीच मंदिरे बंद असल्यामुळे फुलांना मागणी नाही. त्यामुळे फुले उकिरड्यात टाकण्याची वेळ आली आहे. शासनाकडून फुलशेती शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी येथील शेतकरी हणमंत माळी यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com