esakal | "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज"
sakal

बोलून बातमी शोधा

"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज"

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, कोरोनाच्या तिस-या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वच यंत्रणा कार्यरत आहे.

"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज"

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : जिल्ह्यासह फलटण (Phaltan) तालुक्यामध्ये कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. फलटण तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या कोविड केअर सेंटरचे (Covid care centre) रूपांतर जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये (Jumbo Covid Hospital) करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: सातारा पालिकेतील टेंडर प्रक्रियेत 'गोलमाल'

ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वच यंत्रणा कार्यरत आहे. आगामी काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट ही तीव्र स्वरूपाची येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी सर्व उपचार यंत्रणा उभी करण्याचे काम सध्या सुरू आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही धोका सांगितला आहे, म्हणून लहान मुलांसाठीही फलटण येथे स्वतंत्र हॉस्पिटल उभे करण्याचे निर्देश दिले आहेत. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय व लाइफलाइन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेले आहेत.’’

हेही वाचा: हद्दवाढीमुळे सातारा पालिकेच्‍या तिजोरीवर ताण, निधीअभावी विकास रखडला!

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने पावले उचलण्याचे काम सध्या वेगामध्ये सुरू आहे. वेळप्रसंगी तातडीने पावले उचलून आपण आरोग्य सुविधा आणखी बळकट करू, असेही निंबाळकर यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा: सातारा-सोलापूर रेल्वेसाठी खासदार उदयनराजेंना साकडे

ग्रामीण भागामधील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी फलटण तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार हे तालुक्याच्या ठिकाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

loading image