पुणे - बंगळूर महामार्गावर बिबट्याचे ठाण; अर्धा तास खाेळंबली वाहतुक

सचिन शिंदे | Wednesday, 6 January 2021

आज (बुधवारी) सकाळी आठनंतरही बिबट्याची पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती वन विभागाने दिली. 

कऱ्हाड : पाचवड फाटा येथे पुणे ते बंगळूर महामार्गावर बिबट्या बसल्याचे आढळल्याने खळबळ उडाली. पाचवड येथील जे. के. पेट्रोलपंपासमोर घटना घडल्याने स्थानिकांत घबराट आहे. बिबट्याने महामार्ग रोखल्याची अवस्था होती. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घटना घडली. सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त काळ बिबट्याने ठाण मांडला होता. 

आगाशिवनगर येथील लेण्यातील सुरक्षा रक्षक घरी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली. त्यांनी त्वरीत त्याची माहिती वन विभागाला दिली. वन विभाग तेथे पोचेपर्यंत नागरीकांची वाढलेली गर्दी वाहने पाहून बिबट्याने ऊसात धूम ठोकली. मात्र काही वेळातच तेथे वन विभागाचे कर्माचारी पिंजऱ्यासह पोचले. त्यात वनपाल ए. पी. सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधववर, प्रशांत मोहिते, उत्तम पांढरे, मंगेळ वंजारी, सचिन खंडागळे, धनाजी गावडे व भाऊसाहेब नलवडे तेथे पोचले.

फास्टॅगच्या बंधनावर तासवडे, आनेवाडीत उसळणार विराेधाची लाट? 

Advertising
Advertising

आतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते ?

त्यांच्यासोबत पर्यावरण अभ्यासक रोहन भाटेही होते. मंगळवारी रात्रभर पाचवड फाटा, नांदलापूर, महामार्गालगतचा परिसरात त्यांनी शोध मोहिम राबवली. ऊसात, गडाच्या कडेला शोध घेण्याचे काम आज (बुधवार) सकाळपर्यंत सुरू होते. या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळले आहेत. मात्र बिबट्या काही दिसला नाही. आज (बुधवारी) सकाळी आठनंतरही पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

कॉंग्रेस करणार बांगलादेश मुक्ती संग्रामाची ५० वर्षे साजरी; ए. के. अँटनींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

Edited By : Siddharth Latkar