esakal | पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते

खटावचे माजी सरपंच व आदर्श शिक्षक एम.आर.शिंदे यांचा स्मृतिदिन खटावला विविध उपक्रमांनी झाला.गेली 25 वर्षे विधायक उपक्रमातून शिंदे यांच्या स्मृतिदिन विधायक उपक्रमाने केला जातो. यंदा रौप्यमहोत्सवी स्मृतिदिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरसह  लायब्ररीला पुस्तके भेट व गुणवंत विद्यार्थ्यांनींचा सत्कार करण्यात आला.

पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

खटाव (जि.सातारा) : काळाच्या बदलत्या प्रवाहात वाचनसंस्कृती मागे पडत आहे. पुस्तके विस्मृतीत जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुस्तक दानाचा उपक्रम हा वाचन संस्कृतीला बळ देणारा आहे. युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी व्यक्त केले.
 
येथे माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार (कै.) एम. आर. शिंदे यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुस्तक दान उपक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अरुण आदलिंगे, भूजलतज्ज्ञ विलास भोसले, प्रमोद कांबळे, रमेश अडसूळ, दिलीप जाधव, संजय शहा, नितीन सावंत, ऍड. एम. ए. काझी, नितीन शिंदे, किशोर कुदळे, वैभव वाघ, अनुप शिंदे, संजय सावंत, धीरज कांबळे, प्रल्हाद मदने आदींची उपस्थिती होती.
 
एम. आर. शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते. शिक्षण, समाजकारण, राजकारण यासारख्या विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी भरीव राहिली. हे करताना त्यांची दृष्टी नेहमीच निकोप राहिली. दृष्टिकोन हा देखील विधायक राहिला, असे श्री. विधाते यांनी सांगितले.
 
शिंदे सरांच्या बोलण्यात व वागण्यात एकवाक्‍यता होती. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. सरांच्या स्मृतिदिनी विधायक उपक्रम राबविण्याच्या शिरस्ता गेली 25 वर्षे अविरतपणे सुरू आहे. ही बाबदेखील तितकीच कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले. कोरोनामुळे व्यापक स्वरूपात कार्यक्रम झाला नसला, तरीही आजच्या या छोट्या कार्यक्रमाला मोठा आशय लाभला आहे. या स्टडी सेंटरमध्ये अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविणारे विद्यार्थी घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. श्री. आदलिंगे यांनी आपल्या मनोगतात शिंदे कुटुंबीयातर्फे पुस्तके दान देण्याचा उपक्रम वाचन संस्कृतीला चालना देणारा ठरेल, असे मत व्यक्त केले.

एका वेड्या माणसाची गाेष्ट...!
 
पत्रकार अविनाश कदम यांनी प्रास्ताविक केले. बुद्धम सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमात रजनी सावंत, वृषाली सावंत या भगिनींचा बीएड परीक्षेत उल्लेखनीय यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग'सह हा कार्यक्रम आयोजिण्यात आला. 


गुणवंतांचाही गौरव 

कार्यक्रमात (कै.) एम. आर. शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर, तसेच वाचनालयास वैविध्यपूर्ण पुस्तकांची भेट देण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचाही या वेळी विशेष गौरव करण्यात आला.

साहेब, माझं बाळ कुठे आहे?; अपघातग्रस्त आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top