महाबळेश्‍‍वरात नवख्‍यांना कामाची संधी

इच्छुकांची मांदियाळी; योग्य उमेदवार निवडून देण्याचे मतदारांपुढे आव्हान
Mahabaleshwar Municipal
Mahabaleshwar Municipalesakal

महाबळेश्वर : सर्वांचेच लक्ष लागून राहिलेली आरक्षण सोडत आज पार पडल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ होणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. मात्र, महाबळेश्वरवासीयांना योग्य व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा कामाचा उमेदवार निवडून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आता शहरात ऐन पावसाळ्यातील थंडीत राजकारण मात्र चांगलेच तापणार आहे. सुशिक्षित नवख्‍या उमेदवारांना संधी मिळण्‍याची शक्‍यता आहे.

पालिकेची निवडणूक आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून गत पाच वर्षांत बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी भरघोस निधीची घोषणा केली. त्याअनुषंगाने आता शहर विकासाची कामे ही टप्प्याटप्‍प्याने सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून विकासासाठी मोठी संधीच उपलब्ध झाली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या जशी वाढणार आहे, तशी मतदारांची योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारीदेखील वाढली आहे. प्रभागरचनेत बदल झाले असून गतवेळी एकूण आठ प्रभाग होते. सात प्रभागांमधून दोन-दोन सदस्य तर आठव्या प्रभागातून तीन असे एकूण सतरा सदस्य निवडून गेले होते. यंदा एकूण दहा प्रभाग असून या दहा प्रभागांमधून एकूण २० सदस्य निवडून जाणार आहेत.

सध्या प्रस्थापितांसह नवख्या व सुशिक्षित उमेदवारांना काम करण्याची मोठी संधीच उपलब्ध झाली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागांमध्ये काय लोकहिताची विकासकामे केली, याची पोचपावतीही या निवडणुकीमध्ये त्या उमेदवारांना मतदारांकडून मिळणार आहेच. यंदा मात्र मोठे धुमशानच या निवडणुकीमध्ये पाहिला मिळणार असून ही निवडणूक दोन आघाड्यांमध्ये होते की तिसऱ्या आघाडीचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com