esakal | पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला आलात 'हे' नियम पाळा

बोलून बातमी शोधा

पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला आलात 'हे' नियम पाळा}

महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत, परंतु या गर्दीत शिस्त पाळली जात नाही. मला काही होणार नाही असे आता लोकांनी गृहीत धरले आहे. गर्दीत स्वयंशिस्त आवश्यक आहे, अन्यथा ही गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते. म्हणून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील दिवाळीच्या सुटीतील महाबळेश्वर आणि पाचगणीतील गर्दी पाहून केले हाेते. 

पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला आलात 'हे' नियम पाळा
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा  : सलग सुट्ट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळ पर्यटकांनी बहरली आहे. नाताळ आणि सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी तसेच नववर्षाची मजा लुटण्यासाठी राज्यासह अन्य राज्यातील पर्यटकांनी महाबळेश्वर आणि पाचगणीलाच पसंती दिल्याचे येथे चित्र आहे. दरम्यान पर्यटकांनी काेविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करून पर्यटन करावे असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाचे असल्याने येथील पालिका कर्मचारी पर्यटकांना त्याबाबतच्या सूचना देत आहेत. काही ठिकाणी नियमाचा भंग केल्याने दंडाची पावतीही पर्यटकांच्या हाती पडत आहे.

महाबळेश्वर आणि पाचगणी हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने शासनाची परवानगी मिळताच बऱ्याच पर्यटकांनी पर्यटनासाठी महाबळेश्वर आणि पाचगणीत गर्दी केली आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टंस ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे बंधनकारक आहे. याबराेबरच हॉटेलमध्ये निवासासाठी अनेक निर्बंध घटल्याने या नियमांचे उल्लंघन होवू नये यासाठी दाेन्ही पालिकेचे पथक पर्यटकांवर नजर ठेवून आहे. पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या शासनाने दिलेल्या नियमांचे पर्यटकांनी पालन करावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहाेत. 

स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची केशर ही लवकरच मिळणार

विविध पॉइंटस, बाजारपेठ येथे पालिकेची पथकांच्या माध्यमातून पर्यटकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टंस ठेवणे याच्या सूचना केल्या जात आहेत. पर्यटक देखील स्वतःहून काळजी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी आम्हांला पर्यटकांवर आणि व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. शासनाच्या नियमांचे पालन करूनच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन दापकेकर आणि पाटील यांनी केले.

पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी

दरम्यान महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत, परंतु या गर्दीत शिस्त पाळली जात नाही. मला काही होणार नाही असे आता लोकांनी गृहीत धरले आहे. गर्दीत स्वयंशिस्त आवश्यक आहे, अन्यथा ही गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते. म्हणून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील दिवाळीच्या सुटीतील महाबळेश्वर आणि पाचगणीतील गर्दी पाहून केले हाेते. आता पुन्हा नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येथे हाेत असलेली गर्दी पाहून पर्यटकांची काळजी पालिकेच्या माध्यमातून घेतली जात आहे. पर्यटकांनी मास्क न वापरल्यास 500 रुपेय दंड केला जात आहे. दंड हाेऊ नये यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन सातत्याने पथकांच्या माध्यमातून केले जात आहे.