सातारा :आखाड्यात घुमणार शड्डूचा आवाज

महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेला आज सुरुवात; मल्‍ल कुस्‍तीपंढरीत दाखल
Maharashtra Kesari competition starts today satara
Maharashtra Kesari competition starts today satara sakal

सातारा : येथे महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी राज्‍यभरातील मल्‍ल दाखल होण्‍यास सुरुवात झाली असून, या स्‍पर्धेचे उद्‌घाटन मंगळवारी सायंकाळी पाच वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामीण गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई व इतर मान्‍यवर उपस्‍थित राहणार असल्‍याची माहिती राज्‍य कुस्‍तीगीर परिषद आणि जिल्‍हा तालीम संघाच्‍या वतीने संयुक्‍त पत्रकार परिषदेत देण्‍यात आली. या वेळी कुस्‍तीगीर परिषदेचे कार्याध्‍यक्ष नामदेवराव मोहिते, कार्यकारी सचिव ललित लांडगे, जिल्‍हा तालीम संघाचे दीपक पवार, सुधीर पवार, संदीप मांडवे व इतर पदाधिकारी उपस्‍थित होते.

दीपक पवार म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, यात ४५ संघांच्‍या माध्‍यमातून ९०० च्‍या आसपास राज्‍यभरातील मल्‍ल आणि ११० प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. स्‍पर्धेचे उद्‌घाटन मंगळवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. तब्‍बल ६१ वर्षांनंतर महाराष्‍ट्र केसरीचे यजमानपद साताऱ्याला राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार आणि कुस्‍तीगीर परिषदेचे अध्‍यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्‍यामुळे मिळाले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्‍पर्धेत विविध वजनी गटात सकाळी आणि संध्‍याकाळच्‍या सत्रात कुस्‍त्‍या होणार आहेत.’’ यासाठी मातीचे दोन, तर गादी प्रकारातील आखाडे तयार करण्‍यात आले आहेत. या आखाड्यांच्‍या मदतीने दररोज दोन सत्रांत कुस्‍त्‍यांची रंगत सातारकरांना पाहावयास मिळणार असून, ५५ हजार प्रेक्षक एकावेळी या कुस्‍त्‍या पाहू शकणार आहेत. महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था केल्‍याचेही श्री. पवार यांनी या वेळी सांगितले.

ललित लांडगे म्‍हणाले,‘‘ पाच दिवस राज्‍यभरातील नामवंत मल्‍ल याठिकाणी एकमेकांना भिडणार आहेत. या स्‍पर्धेची अंतिम फेरी ता. ९ रोजी सायंकाळी पार पडणार आहे. या स्‍पर्धेच्‍या निकालावेळी खासदार शरद पवार, सार्वजनिक

बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्‍यवर मंत्री उपस्‍थित राहणार असून, त्‍यांच्या हस्‍ते विजेत्‍या मल्‍लास महाराष्‍ट्र केसरीची गदा देण्‍यात येणार आहे. स्‍पर्धेत

सहभागी होणाऱ्या मल्‍लांना आवश्‍‍यक त्‍या सुविधा पुरविण्‍यासाठी कुस्‍तीगीर परिषद आणि तालीम संघ कार्यरत आहे.’’

असे आहेत आजचे कार्यक्रम

  • सकाळी ९ वा. : पंचांचे आगमन.

  • सकाळी ९.३० : पंच उजळणी वर्ग.

  • दुपारी १२ वा : सर्व मल्‍लांचे संघांसमवेत आगमन.

  • दुपारी २ वा. : मल्‍लांची वैद्यकीय, वजन तपासणी.

  • सायंकाळी ६ वा : कुस्‍ती स्‍पर्धा (५७, ७०, ९२ किलो वजनी गटात, माती, गादी आखाड्यात).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com