खाणपट्यासाठी वडार समाज गाढवांसह धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

खाणपट्यासाठी वडार समाज गाढवांसह धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

सातारा : वडार समाजाला खाणपट्टे देण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, यात मागणी मान्य न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

खाणकाम हा वडार समाजाचा पूर्वापार पिढीजात व्यवसाय आहे. यासाठी या समाजाला शासनाच्या वतीने खाणपट्टे देण्यात आले होते. नागेवाडी (ता. सातारा) येथील खाणपट्टे सध्या शासनाने मुदत संपल्याच्या, तसेच इतर कारणांवरून बंद केले आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळ खाणपट्टे बंद असल्याने वडार समाजाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठीचे निवेदन वडार समाजाच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले होते. या निवेदनात वडार समाजाची मागणी मान्य न केल्यास मंत्रालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

साेळा लाखाच्या बोकडाचा पोलिसांनी लावला छडा; आटपाडीतील तिघे ताब्यात

ओला कॅबचालकाचा मांढरदेव घाटात खून? 

या इशाऱ्यानुसार महाराष्ट्र वडार समाज संघाच्या नेतृत्वाखाली वडार समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढवांसहीत मोर्चा काढला. पोवई नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारा गाढव मोर्चा सातारा शहर पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर वडार समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत वडार समाजावर करण्यात आलेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. माेर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास दिले असून, त्यात आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिक्षकाने राबविलेल्या स्टोरी ऑन फोन उपक्रमास जागतिक पुरस्कार 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com