Satara : यशवंतरावांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Satara : यशवंतरावांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्रासाठी असलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या विचारांवर राज्य शासनाचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थळास सहकारमंत्री पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, नगरसेवक सौरभ पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.

त्यानंतर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कऱ्हाड शहराध्यक्ष नगरसेवक आप्पा माने, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, नगरसेवक इंद्रजित गुजर, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव आदींनी अभिवादन केले. दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह नगरसेवक, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी अभिवादन केले.

दरम्यान, या वेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्येष्ठ नेते चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. पुरोगामी विचाराने महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, या विचाराने त्यांनी काम केले. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली. महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून, त्यांच्या विचारांवर महाराष्ट्र शासनाचे काम सुरू आहे.’’

खासदार पाटील म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी गोरगरिबांच्या घरी ज्ञानाचा दिवा लागावा, यासाठी मोफत शिक्षण दिले, ईबीसी सवलत दिली. त्यातून अनेकांना शिक्षणाची दारे खुली झाली. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रात ज्यांना माणले जाते, ज्यांच्या पावलावर मस्तक ठेवल्यावर आनंद मिळतो. वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्यांच्या अंतसमयापर्यंत मला त्यांनी सहवास दिला. माझ्या वडिलांप्रमाणे ज्यांनी मला आशीर्वादाने हे स्थान प्राप्त करून दिले. ते यशवंतराव चव्हाण आहेत. त्यांना मी अभिवादन करतो.’’

loading image
go to top