esakal | महाविकास आघाडी सरकारचा भाजपकडून निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

 महाविकास आघाडी

महाविकास आघाडी सरकारचा भाजपकडून निषेध

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कराड : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवेसना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने वेळीच इंम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर ओबीसींवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. राज्यातील या महाभकास आघाडीचा उद्या (बुधवारी) येतील दत्त चौकात भाजपतर्फे जाहीर निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विकआम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी व ओबीसीमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषेदत दिली.

श्री. पावसकर म्हणाले, माहाविकास आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्याचे होते. म्हणून न्यायालयातही त्यांनी इंम्पेरिकल डेटा दिला नाही. ओबीसींचे आरक्षण संपुष्ठात आले. म्हणजेच सरकारने मागासवर्गीय आयोग नेमूनसुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही. आम्ही केवळ ओबीसी समाजासोबत आहोत असा दिखावा फक्त राज्यातील आघाडी सरकारने करून राज्यातील ओबीसी समाजाची फसवणूक केली.

हेही वाचा: सांगली : एलईडी प्रकल्पाबाबत स्मार्ट कंपनीची याचिका फेटाळली

चार मार्च रोजी पाच जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे जिल्हा परिषद सदस्य यांना अपात्र ठरविण्याच्या निर्णय जेव्हा न्यायालयाने दिला तेव्हापासून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते वारंवार आघाडी सरकारला सांगत होते की जर राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण टिकवायचे असेल तर राज्यात मागासवर्ग आयोग गठीत करून त्या माध्यमातून इंम्पेरियकल डेटा संकलित करावा. तो न्ययालयात सादर करावा. तसे निर्देश न्यायालयांनी १३ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सरकारला दिले होते. परंतु सरकारने हेतुपुरस्परपणे त्याकडे दुर्लक्ष केले.

श्री. बागडी म्हणाले, जातिनिहाय जनगणना करावी व २०११ चा डेटा केंद्र सरकारने द्यावा अशा प्रकारची वक्तव्य आघाडीतील मंत्री व नेते खोट्या वल्गना करीत बसले. इंम्पेरिकल डेटाच आवश्यक आहे ती गोष्ट लक्षात आल्यानंतरही इंम्पेरिकल डेटा गोळा करण्याबाबत मागासवर्ग आयोगाला अधिकार दिले नाहीत.

हेही वाचा: सातारा : यंदाही पालिकेतर्फे फिरते मुर्ती संकलन केंद्र

कोणतीही एजन्सीही याबाबत नियुक्ती केली नाही. ओबीसी समाजाला खोट्या आशेवर ठेवून त्यांची समाजाची दिशाभूल करून पद्धतशिरपणे ओबीसी समाजाला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून बाजूले केले. म्हणून सरकारचा ओबीसी समाजातर्फे व भाजपच्या ओबीसी मोर्चाच्यावतीने जाहीर निषेध करत आहेतो. त्यासाठी उद्या (बुधवारी) येतील दत्त चौकात निषेध करण्यात येमार आहे. ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व सरकाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. यावेळी ओबीसी मोर्चा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांनाही निषेध केला.

loading image
go to top