पदवीधर निवडणुकीत पाटण तालुका इतिहास घडवेल : हिंदुराव पाटील

पदवीधर निवडणुकीत पाटण तालुका इतिहास घडवेल : हिंदुराव पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी तिन्ही मोठे पक्ष आणि मित्रपक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजय होतील. यानिमित्ताने पाटण तालुक्‍यातूनही मताधिक्‍याचा नवा विक्रमही घडेल, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांनी व्यक्त केला.
 
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ येथे कॉंग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कॉंग्रेसचे पाटण तालुका अध्यक्ष पांडुरंग यादव, युवक कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस अभिजित पाटील, नगरसेवक प्रशांत साळुंखे, युवकचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटणकर, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई आचरे, अविनाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील, आर. बी. पाटील, सरपंच अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आदींसह तालुक्‍यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी शिक्षक व पदवीधर मतदार उपस्थित होते.

हिंदुराव पाटील म्हणाले, ""भाजपच्या सरकारने देश खिळखिळा केला आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेविषयी कसलीही जाण नाही. भाजपला रोखून देश वाचविण्यासाठी विविध पक्ष एकत्र येत आहेत. राज्यामध्येही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्र पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केलेली आहे. त्यांच्याच माध्यमातून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार देण्यात आले आहेत. त्यांना चांगल्या मताने विजय करून विधान परिषदेवर पाठवूया.''
 
अभिजित पाटील म्हणाले, ""पाटण तालुक्‍यातील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्याने राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे, तरीसुद्धा आपण गाफील न राहता जागरूकपणे मतदान करावे. बाहेरगावी असलेल्या मतदारांना संपर्क करून जास्तीतजास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यावे.'' नरेंद्र पाटणकर व उमेदवारांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. अभिजित कडव यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग यादव यांनी आभार मानले.

उदयनराजेंच्या टीकेला शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर; केंद्राकडे पाठपुराव्याचा दिला सल्ला

Edited By : Siddharth Latkar 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com