esakal | एकदम झक्कास! खडकीच्या शेतकऱ्याचा आंबा दुबईला रवाना; माणदेशात 300 जातीच्या रोपांची लागवड
sakal

बोलून बातमी शोधा

Mandesha Mango

एकदम झक्कास! खडकीच्या शेतकऱ्याचा आंबा दुबईला रवाना; माणदेशात 300 जातीच्या रोपांची लागवड

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

म्हसवड (जि. सातारा) : खडकी (ता. माण) येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळबागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांच्या हस्ते या बागेतील आंबा फळांची तोडणी करण्यात आली.

श्री. पवार म्हणाले, ""श्री. वेदपाठक कुटुंबास बागेतच प्रतिकिलो 140 ते 150 रुपये किलो दराने आंबा विक्री झाल्यामुळे या शेतकरी कुटुंबास सुमारे 15 लाखांचे उत्पन्न मिळू शकले. तालुक्‍यात शासकीय अनुदानातून 258 आंबा, एक हजार 500 डाळिंब, प्रत्येकी 200 हेक्‍टर पेरू व सीताफळाची लागवड झाली आहे. मोसंबी, चिक्कू, संत्रा, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांचेही प्रयोग यशस्वी झाले आहेत. निर्यातक्षम फळबागांचे जर शास्त्रीय पध्दतीने संगोपन केले तर फळे निर्यात करून विक्रमी दराने विक्री करणे शक्‍य होते.''

प्रभाकर वेदपाठक म्हणाले, "2009 मध्ये आम्ही केसर जातीच्या 300 रोपांची लागवड केली होती. त्यात शासनाच्या कृषी विभागाचे वेळोवेळी प्रोत्साहनपर असे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सर्व निकषांचे पालन करून बाग यशस्वीरित्या जोपासण्यास यश मिळविले. यात पत्नी भाग्यश्री व बंधू प्रमोद यांचेही योगदान मोलाचे आहे.'' या वेळी भाग्यश्री वेदपाठक, प्रमोद वेदपाठक, प्रभारी मंडल कृषी अधिकारी सदाशिव बनसोडे, कृषी पर्यवेक्षक सिद्धार्थ भोसले, कृषी सहायक जयवंत लोखंडे, राहुल कांबळे, महेश वाघ, गणेश माळी, अक्षय कुंभार, संजय बेलदार, रणजित आरगे, बापू केंजळे, महेश फुले व आंबा खरेदीदार व्यापारी उपस्थित होते.