कोरोना योद्‌ध्याच्या मृत्यूने म्हसवडकर हळहळले

कोरोना योद्‌ध्याच्या मृत्यूने म्हसवडकर हळहळले

म्हसवड (जि. सातारा) : कोरोनाने मृत्यू झालेल्या 23 नागरिकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेल्या येथील पालिका कर्मचारी विनोद शामराव सरतापे यांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या घटनेने येथील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
म्हसवड शहर व परिसरात कोरोनाने थैमान घातले असून, शहरातच बाधितांची संख्या साडेपाचशेच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या अंत्यविधीची जबाबदारी शासनाने येथील पालिकेकडे दिली होती. याकामी पालिकेने पाच कामगारांची नियुक्ती केली होती. यामध्ये विनोद सरतापे यांचाही समावेश होता.

मराठा विद्यार्थी, नोकरदारांसाठी आता पुन्हा न्यायालयीन लढाई
 
गेल्या चार महिन्यांत सरतापे यांनी 23 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते. या कोरोना योद्‌ध्यास कोरोनाची लागण कधी झाली, ते समजू शकले नाही. अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला. स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, कामात कर्तव्यदक्ष असल्यामुळे पालिकेने त्यांची नियुक्ती अग्निशमन सेवा दलात केली होती. पुढे शहरात कोरोनाच्या साथीचा फैलाव वाढू लागताच कोरोनाच्या साथीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नेमलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या पथकात त्यांचा समावेश करण्यात आला होता. सरतापे यांच्या निधनाने पालिका मुख्याधिकारी यांनी दु:ख व्यक्त करून शासन व पालिकेच्या वतीने मदतीबाबत निश्‍चितपणे प्रयत्न करू, असे सांगितले.

अंडी व चिकन व्यवसायाला ‘अच्छे दिन’, शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय फुलू लागला  

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com