Ashadhi wari : उन्हाच्या झळांनी डबडबले वैष्णव

माउली सोहळा : हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा अखंड गजर
Maulis Palkhi ceremony on the way to Barad
Maulis Palkhi ceremony on the way to Barad

बरड - संस्थानिकांचा दोन दिवसांचा निरोप घेऊन निघालेला माउलींचा पालखी सोहळा आज दिवसभर उन्हाच्या कडक झळांनी डबडबला. तरीही हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर कमी झाला नाही. भक्तिरसात न्हाऊन निघालेला सोहळा बरड मुक्कामी विसावला.

फलटणनगरीतील दोन दिवसांचा मुक्काम उरकून सकाळी साडेसहाला माउलींचा पालखी सोहळा बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला. अवघे फलटणकर दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी विमानतळावर जमा झाले होते. आबालवृद्धांची गर्दी रस्त्याच्या दुतर्फा होती.

माउलींचा रथ फलटण शहरातून बाहेर पडला आणि पुढे रस्त्याच्या दुतर्फा वडाच्या वृक्षराजीच्या सावलीमधून पुढे सरकत होता. वीडणीमधील सकाळची न्याहारी करून सोहळा पिंपरदला दुपारच्या जेवणासाठी थांबला. सुमारे पाऊण तासाची विश्रांती घेतल्यानंतर सोहळा पुढे बरडच्या दिशेने सरकला. मजल दरमजल करित सोहळा साडेपाचला बरड मुक्कामी विसावला.

वारीत चालताना मिळणारे सुख अलौकिक आहे. ते कुठेही मिळणार नाही. कोरोनामुळे दोन वर्षे वारी करता आली नाही. मात्र यंदा वारी होत असल्याने आनंदी आनंद आहे. हे सुख संपूच नये असे वाटते.

- संगीता राखाडे, धामणी, ता. राख, जि. सातारा.

सोलापूर जिल्ह्यात आज प्रवेश

माउलींचा पालखी सोहळा पुणे आणि सातारा जिल्ह्याचा प्रवास संपवून सोमवारी धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. वारी शेवटच्या टप्प्यात आल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com