esakal | अपयश लपवण्यासाठीच 'जनशक्ती'चा आरोप; रोहिणी शिंदेंचा यादवांवर पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

अपयश लपवण्यासाठीच 'जनशक्ती'चा आरोप; रोहिणी शिंदेंचा यादवांवर पलटवार

जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी नगराध्यक्षा ठरावावर स्वाक्षऱ्या करत नसल्याचा आरोप केला. मात्र, एका दिवसातच कऱ्हाड स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतून थेट बाहेर कसे पडले, असा सवाल करून अपयश लपवण्यासाठी जनशक्ती आघाडी आरोप करत असल्याची टीका नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केली.

अपयश लपवण्यासाठीच 'जनशक्ती'चा आरोप; रोहिणी शिंदेंचा यादवांवर पलटवार

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेच्या सर्वसाधारण मासिक बैठकीतील स्वच्छता अभियानाचे ठराव पाच ऑक्‍टोबरला स्वाक्षरी करून दिले आहेत. शासकीय सुट्या आल्याने विलंब झाला. मात्र, एका दिवसातच कऱ्हाड स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतून थेट बाहेर कसे पडले, असा सवाल करून अपयश लपवण्यासाठी जनशक्ती आघाडी आरोप करत आहे, अशी टीका नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी केली. 

जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी नगराध्यक्षा ठरावावर स्वाक्षऱ्या करत नसल्याचा आरोप केला. त्याला नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, माजी उपाध्यक्ष फारूक पटवेकर, सुरेश पाटील, शिवराज इंगवले, नथुराम कुंभार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाल्या, "पालिकेची मासिक सभा 21 सप्टेंबरला झाली. त्यानंतर 29 सप्टेंबरला ठराव स्वाक्षरीला आले. त्यानंतर 30 सप्टेंबरला विरोधकांच्या पत्रांची पाहणी केली. 2, 3 व 4 शासकीय सुटी आली. 

चुकीला माफी नाही, राजेंद्र यादवांची नगराध्यक्षा शिंदेंवर कडाडून टीका

दुसऱ्याच दिवशी 5 सप्टेंबरला ठरावावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. शासकीय सुट्यांमुळे एका दिवसाचा विलंब झाला. मात्र, एका दिवसातच लगेच कऱ्हाड स्वच्छ स्पर्धेतून बाहेर कसे पडले, हाच खरा प्रश्न आहे. त्यासाठी जनशक्तीने मला दोषी धरले आहे. म्हणजे चांगले केले आम्ही अन्‌ वाईट झाले की तुम्ही, ही वृत्ती स्वच्छता अभियानात आड येत आहे. मात्र, एकट्या नगराध्यक्षा कशा जबाबदार असतील, हाच खरा प्रश्न आहे, असा पलटवार केला.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image