Satara News | खाणींचे व्यवहार ‘ईडी’च्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mining

खाणींचे व्यवहार ‘ईडी’च्या रडारवर

कऱ्हाड : सातारा, सांगली जिल्ह्यांच्या सीमावर्ती शेरे- संजयनगर, चौरंगीनाथ येथील खाणींतील आर्थिक व्यवहारांची ‘ईडी’मार्फत (अंमलबजावणी संचालनालय) चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे या खाणींतील उत्खनन कारवाईच्या कचाट्यात आहेत. सोनसळ (जि. सांगली) येथील विश्राम कदम यांच्या तक्रारीचा दखल घेत ‘ईडी’ने चौकशी सुरू केली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील शेरे- संजयनगर व कडेगाव तालुक्यातील चौरंगीनाथ डोंगराच्या परिसरात खाणी आहेत. चौरंगीनाथ डोंगरावर वन विभागाने विविध योजना राबवून तेथे पर्यटनस्थळ विकसित केले आहे. त्या लगतच्याच डोंगरात होणारे उत्खननावर सातत्याने आरोप होत आहेत. सातारा व सांगली जिल्ह्याचा हा सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या सीमांचाही विचार करून उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत. सोनसळ येथील सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी त्याबाबत अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार दाखल केली होती.

त्याची दखल घेऊन ‘ईडी’तर्फे त्या विभागातील खाणींची चौकशी सुरू झाल्याचे लेखी पत्र श्री. कदम यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे चौरंगीनाथसह संजयनगर (ता. कऱ्हाड) येथील खाणींच्या व्यवहाराची ‘ईडी’तर्फे तपास सुरू झाला आहे. त्यानुसार लवकरच त्याची चौकशी होऊन कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्याबाबत श्री. कदम म्हणाले, ‘‘चौरंगीनाथ हे ऐतिहासिक ठिकाण आहे. त्याला संजयनगर परिसरातील उत्खननाने धोका पोचला आहे. त्या परिसरात शक्तिशाली १९ यंत्राद्वारे उत्खनन सुरू आहे. त्यासाठी लावल्या जाणाऱ्या भूसुरुंगामुळे चौरंगीनाथ डोंगराला धोका पोचला आहे. त्याविरोधात ‘ईडी’कडे तक्रार दाखल केली आहे. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करून मनी लॉँड्रीसारखा प्रकार सुरू आहे. त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ विभागाला ऑनलाइन पद्धतीने याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन अर्थ विभागाकडून १६ फेब्रुवारी २०२२ पासून कार्यवाही सुरू झाली आहे. आता प्रत्यक्षात ‘ईडी’तर्फे त्या खाणींच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी होणार आहे.

खाणींमध्ये परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करून मनी लॉँड्रीसारखा प्रकार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ विभागाला ऑनलाइन पद्धतीने याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन १६ फेब्रुवारी २०२२ पासून कार्यवाही सुरू झाली आहे.

- विश्राम कदम,सोनसळ (जि. सांगली)

Web Title: Mining Transactions Ed Inquiry Vishram Kadam Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..