..म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी जिगरबाज पोलिसांची थोपटली पाठ

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Summary

अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयितास सातारा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तालुका पोलिस, सातारा शहर पोलिसांनी (Satara Police) तपास करून तातडीने अटक केली. त्याबद्दल या तिन्ही पोलिस पथकास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलवून त्यांचं विशेष कौतुक केलं. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

या वेळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, विश्वजित घोडके, भगवान निंबाळकर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, ‘‘अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद असून, अशा अत्याचार करणाऱ्या संशयितास सातारा पोलिस दलाने तत्काळ तपास करून गुन्हा दाखल केला आहे. समाजातील अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी पोलिस दल नेहमीच आपले कर्तव्य बजावित असतात. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व सातारा तालुका पोलिस यांनी संयुक्त प्रयत्न करून संशयितास तत्काळ अटक केली आहे. त्याबद्दल या तिन्ही पथकाचे विशेष कौतुक आहे.’’

Shambhuraj Desai
कुस्तीपटू सुशील कुमारच्या जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांचा विरोध

पारधी समाजातील नागरिकांसाठी पुनर्वसन योजना आहेत. मात्र, या योजनांचा हा समाज लाभ घेत नाही. जुन्या वळणातून ते बाहेर पडत नाहीत. निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी पारधी पुनर्वसनाचा चांगला प्रयत्न केला होता. आता त्याच धर्तीवर एखादा पुनर्वसन प्रकल्प राबवला जाईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत मी स्वत: पालकमंत्र्यांशी बोलणार असून, यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करण्याबाबत सूचना करणार आहे. पालिकांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यास शासन आपल्या अधिकारांचा वापर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com