esakal | महिलेवर अत्याचारप्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Satara : महिलेवर अत्याचारप्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेढा (सातारा) : जावळी तालुक्यातील एक गावात शेळीपालन शेडमध्ये राहत असलेल्या मजूर महिलेवर तिच्या पतीच्या मित्रानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करून कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने मेढा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय २२, रा.मध्यप्रदेश) आपल्या पतीसोबत जावळी तालुक्यातील एका गावात शेळीपालन शेडमध्ये राहायला आहे. ही महिला ३० सप्टेंबर रोजी आपल्या मुलीसोबत शेडमध्ये झोपली होती. त्याच खोलीत तिच्या पतीचा अल्पवयीन मित्रही झोपला होता. त्यावेळी अल्पवयीन मित्राने मध्यरात्री महिलेवर अत्याचार केला.

याबाबत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याला रिमांडहोम सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास मेढा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल माने करीत आहेत.

loading image
go to top