कोरोना रुग्णांसाठी 500 इंजेक्‍शन्स पुरविणार ; ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या संकल्पनेतून 'यांचा' पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांसाठी 500 इंजेक्‍शन्स पुरविणार ; ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या संकल्पनेतून 'यांचा' पुढाकार

ही इंजेक्‍शन्स महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती घेणे परवडत नाही. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी 125 इंजेक्‍शन्स पाठवली आहेत. वाईतील रुग्णांसाठी अशी इंजेक्‍शन मिळाली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन आमदार मकरंद पाटील विविध बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करत आहेत.

कोरोना रुग्णांसाठी 500 इंजेक्‍शन्स पुरविणार ; ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या संकल्पनेतून 'यांचा' पुढाकार

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि.सातारा) : कोरोनावर लस उपलब्ध होईपर्यंत भागातील कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेणे आवश्‍यक आहे. या रुग्णांना द्यावी लागणारी इंजेक्‍शन्स महागडी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ती घेणे परवडत नाही. त्यासाठी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघात 500 इंजेक्‍शनची बॅंक करणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
 
गरजू रुग्णांसाठी इंजेक्‍शन्स मोफत उपलब्ध करून देण्याची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. त्यानुसार वाई मतदारसंघात 500 इंजेक्‍शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाबळेश्वरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एका उद्योगपतीने 41 इंजेक्‍शन्स दिली आहेत. वाई शहर व तालुक्‍यातील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय घेतला असून ही मंडळेही 50 इंजेक्‍शन देणार आहेत. वाई जैन समाजाने 25 इंजेक्‍शन उपलब्ध करून दिली आहेत.

जागतिक वडापाव दिन विशेष : सातारच्या वडापावची चवच न्यारी

फोन अ फ्रेंड उपक्रमातून रयतच्या 'या' शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा 

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील अनेक घटक पुढे आले असून ते या कामात योगदान देत आहेत. त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घेत इतरांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडिसिव्हर इंजेक्‍शनची मदत करावी, असे आवाहन केल्यानुसार महाबळेश्वर तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतीच ही इंजेक्‍शन्स आमदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

विघ्नहर्ता संकल्पनेतून साताऱ्यात काेरोना योद्ध्यांना सलाम
 
ही इंजेक्‍शन्स महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती घेणे परवडत नाही. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी 125 इंजेक्‍शन्स पाठवली आहेत. वाईतील रुग्णांसाठी अशी इंजेक्‍शन मिळाली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन आमदार मकरंद पाटील विविध बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करत आहेत. 

कृष्णा नदीवर 'येथे' बांधला जाणार नवीन पूल; 13 कोटी मंजूर

गरजू रुग्णांना इंजेक्‍शन देणार 

वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दररोज 50 ते 100 कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मतदारसंघातील नागरिकांचा पुणे, मुंबई, सोलापूरशी संपर्क होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडिसिव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत असतो. सध्या वातावरणातील बदल आणि चाचण्या वाढविल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मतदारसंघात 500 इंजेक्‍शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत धावला वाईतील जैन समाज

Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर

त्यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. वाईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत कोरोना औषध बॅंक हा अभिनव उपक्रम राबविला आहे. कार्यकर्त्यांनीही मदतीचा हात दिला आहे. त्यातून 500 इंजेक्‍शन्सची बॅंक केली जाईल. गरजूंना या इंजेक्‍शनची मदत होईल, असे आमदार मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top