'ज्यांची बॅंकेत खाती नाहीत, त्या पूरग्रस्तांना रोख रक्कम द्या'

Prithviraj Chavan
Prithviraj Chavanesakal

कऱ्हाड (सातारा) : मुसळधार पावसासह (Heavy Rain In Satara) आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी प्रयत्न करत आहे. बाधितांच्या बॅंक खात्यावर (Bank account) भरपाईची रक्क जमा होणार आहे. मात्र, ज्यांची बँकेत खाती नाहीत, त्या बाधितांना शासनाने मदतीची रोख रक्कम द्यावी, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी पत्रकरांशी बोलताना व्यक्त केले. (MLA Prithviraj Chavan Demands Help To The Citizens Affected By Rain bam92)

Summary

कऱ्हाड तालुक्यातील काले, नांदगाव, उंडाळे, टाळगांव, येळगांव, बांदेकरवाडीसह नुकसानग्रस्त भागाची आमदार चव्हाण यांनी पाहणी केली.

कऱ्हाड तालुक्यातील काले, नांदगाव, उंडाळे, टाळगांव, येळगांव, बांदेकरवाडी, कोळे, आणे, येणके, पोतले भागातील नुकसानग्रस्त भागाची आमदार चव्हाण यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशीही आमदार चव्हाणांनी संवाद साधला. यावेळी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, नानासाहेब पाटील, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, राहूल चव्हाण उपस्थित होते.

Prithviraj Chavan
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करा : खासदार पाटील

आमदार चव्हाण म्हणाले, राज्याच्या मंत्रीमंडळाने जो काही निर्णय घेतला आहे, तो ज्यांची बँक खाती आहेत, त्यांना थेट मदत देण्यास काहीच अडचण नाही. मात्र, ज्यांची बँक खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख रक्कम दिली पाहिजे. शासकीय यंत्रणेने नुकसानग्रस्तांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून लोकांना मदत मिळवून द्यावी. लोकांना मदत मिळण्यासाठी काही मदत लागण्यास मी स्वतः लक्ष घालेन, असेही त्यांनी सांगितले.

MLA Prithviraj Chavan Demands Help To The Citizens Affected By Rain bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com