Shivendrasinghraje Bhosale
Shivendrasinghraje Bhosaleesakal

कोरोनाचा उच्चांक गाठलेल्या साताऱ्यात आयसोलेशन सेंटर सुरू करा

सातारा : साताऱ्यातील बाधितांची संख्या जास्त असून, त्यापैकी अनेक जण गृहविलगीकरणात आहेत. गृहविलगीकरणात असणाऱ्यांमुळे कुटुंबातील इतर बाधित होण्याचा धोका आहे. कोरोनाची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी शहरात मध्यवर्ती आयसोलेशन सेंटर (Isolation Centre) सुरू करण्याचे आदेश सातारा पालिकेस देण्याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे केली. (MLA Shivendrasinharaje Bhosale Demands To Start Isolation Center In Satara)

Summary

जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी तसे विलगीकरण कक्ष सुरू केले असून, त्याबाबत सातारा पालिकेचे धोरण उदासीन असल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलीय.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "साताऱ्यातील अनेक जण छोटे घर, फ्लॅटमध्ये गृहविलगीकरणात आहेत. यामुळे त्याचा धोका इतर कुटुंबीयांना होऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने गृहविलगीकरणात असणाऱ्यांचे नातेवाईक इतरत्र फिरतात. त्यामुळे बाधितांची संख्य वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गृहविलगीकरणातील बाधितांचे स्वतंत्र विलगीकरण होणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी तसे विलगीकरण कक्ष सुरू केले असून, त्याबाबत सातारा पालिकेचे धोरण उदासीन आहे.'' शहराच्या विविध भागांत पालिकेच्या इमारती असून, त्यात विलगीकरण सेंटर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसे आदेश देण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडे केली. चर्चेनंतर तसे आदेश देण्याची कार्यवाही करण्याचे आश्‍वासन सिंह यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले. याचवेळी त्यांनी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग, टेस्टिंगचे प्रमाण गतवेळेप्रमाणे वाढविण्याची मागणीही केली.

MLA Shivendrasinharaje Bhosale Demands To Start Isolation Center In Satara

Shivendrasinghraje Bhosale
सातारा : अधिका-यांसह रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com