MNS : मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; आठ दिवसांचा दिला अल्टिमेटम

Maharashtra Navnirman Sena
Maharashtra Navnirman Senaesakal
Summary

'..अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल.

सातारा : शहरातील सर्व दुकाने आस्थापना यांचे फलक व पाट्या ठळक व मोठ्या अक्षरात मराठी भाषेत करावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार व महिला आघाडी शहराध्यक्षा वैशालीताई क्षीरसागर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सहायक कामगार आयुक्तांना देण्यात आले आहे.

या वेळी श्री. पवार व क्षीरसागर यांच्यासमवेत शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, अझर शेख, प्रशांत सोडमिसे, विभाग अध्यक्ष गणेश पवार, अविनाश भोसलेसह पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. यासंदर्भात मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले, की महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम १९६१ च्या कलम २० नुसार आस्थापना व दुकाने यांच्यावर मराठीत मोठ्या अक्षरांत पाट्या असणे बंधनकारक आहे. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मराठी अस्मितेसाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत.

Maharashtra Navnirman Sena
कानपूर दंगलीवरून राजकारण तापलं; मायावती स्पष्टच म्हणाल्या, राष्ट्रपती-पंतप्रधानांनी..

या आंदोलनांमुळे अनेक इंग्रजी पाट्या मराठी करण्यास भाग पाडले आहे. याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे. राज्य शासनाने सुधारित अधिनियम १६ मार्च २०२२ नुसार कारवाई करण्याबाबत संबंधित विभागात कळविले आहे. सातारा शहर, तसेच उपनगरांत अजून अनेक दुकाने आस्थापना यांच्या पाट्या इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे त्या तातडीने बदलून मराठी भाषेत कराव्यात. याबाबत दुकाने निरीक्षक यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात यावी. येत्या आठ दिवसांत इंग्रजी पाट्या बदलून मराठीत कराव्यात. अन्यथा, तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा श्री. पवार यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com