'तुमचा कुत्रा बांधून ठेवत जा'; मालकानं चिडून माय-लेकावर केला कुऱ्हाडीनं घाव; हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog Satara Crime News

दीपकनं ‘तुमचा कुत्रा बांधून ठेवत जा,’ असं त्यांना सांगितलं अन्..

'तुमचा कुत्रा बांधून ठेवत जा'; मालकानं चिडून माय-लेकावर केला कुऱ्हाडीनं घाव; हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : करंजखोप (ता. कोरेगाव) इथं कुत्रा (Dog) अंगणात आला म्हणून तो बांधून ठेवत जा, असं सांगितल्यानं कुत्र्याच्या मालकानं चिडून कुऱ्हाडीनं घाव घातल्यानं मुलगा आणि आई गंभीर जखमी झाले. दीपक धोंडिराम यादव व मंगल धोंडिराम यादव असं जखमींचं नाव आहे. काल सकाळी आठ वाजता हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी (Police) सांगितलं, की विनोद धनाजी शिंदे आणि अक्षय धनाजी शिंदे (रा. करंजखोप, ता कोरेगाव) यांचा कुत्रा दीपकच्या अंगणात आला. म्हणून दीपकनं ‘तुमचा कुत्रा बांधून ठेवत जा,’ असं त्यांना सांगितलं. या कारणावरून अक्षयनं दीपकला पकडलं व विनोदनं जनावरांच्या गोठ्यातून कुऱ्हाड घेऊन शिवीगाळ व दमदाटी करत दीपकच्या दोन्ही हातांवर घाव घातला. या वेळी दीपकची आई मंगल या भांडणं सोडवण्यास गेल्या असता विनोदनं त्यांच्याही उजव्या हाताच्या पंजावर कुऱ्हाड मारली.

हेही वाचा: Sushma Andhare : मुक्ताईनगरात ठाकरे गटाला धक्का; सुषमा अंधारेंच्या सभेवर घातली बंदी

या हल्ल्यात दीपक व मंगल जखमी झाले. याबाबत धोंडिराम यादव यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात (Vathar Station Police) फिर्याद दिली असून, विनोद शिंदे व अक्षय शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार मठपती पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे