शासनाच्या मधाचा गोडवा राज्यभर पोहोचवा; खासदार पाटलांचं आवाहन

Shriniwas Patil
Shriniwas Patilesakal
Summary

मधुबनच्या मधाचा गोडवा आता एका मराठी माणसाच्या सहकार्याने राज्यभर मिळणार आहे.

कऱ्हाड (सातारा) : महाबळेश्वरच्या (Mahabaleshwar) शासकीय मधुबन (Madhuban) येथील मध म्हणजे जगात भारी. या मधुबनच्या मधाचा गोडवा आता एका मराठी माणसाच्या सहकार्याने राज्यभर मिळणार आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांनी केले. कऱ्हाड येथील एसटी बसस्थानकासमोरील परिसरात शासकीय मधुबनच्या मध विक्रीच्या गंगा शॉपीतील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखाना अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, के. एन. गुजर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, जिल्हा केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील, मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी, दिलीप सांळुखे, मीना चव्हाण, स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ चव्हाण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद चव्हाण, माजी सरपंच शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

Shriniwas Patil
'संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सोमय्यांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू'

खासदार पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात निसर्ग संपन्नता आहे. या दऱ्या खोऱ्यात अनेक वनौषधी आहेत. महाबळेश्वरचा मधुबनचा मध जगात भारी आहे. वैद्यकीय उपचारासाठी तो उपयुक्त आहे. तो राज्यभर मिळावा, पोचावा ही अपेक्षा. अरविंद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अॅड. विजयसिंह पाटील सूत्रसंचालन केले. शशिकांत चव्हाण यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com