उदयनराजे उद्या सातारकरांशी साधणार संवाद

उदयनराजे उद्या सातारकरांशी साधणार संवाद

सातारा  : खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी येथील आठ विकासकामांचा प्रारंभ करत नागरिकांशी संवाद साधण्याचे ठरवले आहे. यानुसार कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली.
 
शुक्रवारी सकाळी 11 वाजता खासदार उदयनराजे यांच्या हस्ते राधिका चौक ते राजतारा चौक या रस्त्याच्या डांबरीकरणाचा, राधिका रस्त्यावरील कर्मवीरनगरातील क्‍लब हाउस बांधणीचा, पोलिस मुख्यालय ते मनाली हॉटेल रस्त्याच्या डांबरीकरणाचा, सदरबझारमधील भीमाबाई आंबेडकरनगरातील पाण्याच्या टाकीचा, कांगा कॉलनीत, तसेच मिलिंद हाउसिंग सोसायटीत सुरक्षा भिंत बांधण्याच्या कामाचा प्रारंभ होणार आहे.

उदयनराजेंच्या सातारा विकासला भाजपचा ठेंगा!  

या कार्यक्रमाद दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले हे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, राजू भोसले, सीता हादगे, स्नेहा नलवडे, बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com