दोघांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या चालकास 14 दिवसांची कोठडी

दोघांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या चालकास 14 दिवसांची कोठडी

शिरवळ (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर शिरवळजवळील चौपाळा येथे महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. मागून भरधाव वेगात येणारी मोटार रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वारांच्या अंगावरून गेली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या प्रकरणावरून संशयित चालक अमित लालचंद आईदासनी (वय 27, रा. चेंबूर-मुंबई) यास खंडाळा न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या वेळी दुसऱ्या कारचालकाने गाडी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. त्या चालकाचा शोध शिरवळ पोलिस घेत आहेत. 

या अपघातामध्ये प्रकाश लक्ष्मण लोंबर (वय 60, रा. बोपर्डी, पुणे, सध्या शिरवळ) व विठ्ठल धर्माजी पिसे (वय 58, रा. पिसेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा.नायगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विठ्ठल धर्माजी पिसे व प्रकाश लक्ष्मण लोंबर हे दोघे गणेश बेसन मिलच्या दिशेने दुचाकीवरून (क्र. एम. एच. 45 जी 5964) कामावर जात होते. शिरवळ चौपाळा येथे रस्ता ओलांडताना साताऱ्याकडून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 

यामुळे दुचाकीवर असणारे दोघेही रस्त्यावर खाली पडले. याचदरम्यान पाठीमागून वेगाने आलेल्या मोटारीने (क्र. एम. एच. 02 जेपी 1727) जोरात ब्रेक मारला; पण ती पडलेल्या दोघांच्या अंगावरून पुढे जाऊन थांबली. दोघांपैकी एक जण जागीच ठार झाला. दोघांनाही त्वरित रुग्णवाहिकेतून शिरवळ येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com