सातारा : तरडगावात आईकडून चिमुकल्याचा खून

महिलेने स्वतः फोन करून लोणंद पोलिसांना माहिती दिली
Satara Crime News Updates
Satara Crime News UpdatesSakal

लोणंद - पाच महिन्यांच्या चिमुकल्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून, उशीने नाक व तोंड दाबून जन्मदात्या आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना तरडगाव (ता. फलटण) येथे घडली. या घटनेने येथे खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की तरडगाव येथील पांढरी येथील आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलिस ठाण्यात स्वतः फोन करून तिच्या पाच महिन्‍यांचा लहान मुलगा १२ एप्रिल २०२२ रोजी दुपारी दोन वाजता जिवे मारून पुरला आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा नाही तर मी आणखी दुसऱ्या कोणाचा तरी खून करीन, असे सांगितले होते. त्यावरून लोणंद पोलिसांनी तिच्याकडे जावून खात्री केली असता तिने तिचा पाच महिन्‍यांचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड यास ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक व तोंड दाबून जिवे मारून खून केल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यातील हवालदार विठ्ठल काळे यांनी फिर्याद दिली असून, या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनप्रकरणी महिलेस अटक करण्यात आली आहे. (Satara Crime News Updates)

दरम्यान, संशयित आरती गायकवाड हिला फलटण येथील न्यायालयात हजर केले असता तिला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने सुनावला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वायकर व सहकाऱ्यांनी आज सरकारी पंचांसमवेत घटनास्थळाचा पंचनामा करून ज्या ठिकाणी चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता, त्या ठिकाणी खोदल्यावर बाळाचा मृतदेह मिळून आला. तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवर शवविच्छदन केले. दरम्यान, जन्मदात्या आईने हे कृत्य नेमक्या कोणत्या कारणामुळे केले, याचा पोलिस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com