esakal | बाजारतळाच्या प्रश्नावर खंडाळ्यात व्यापारी असोसिएशनच्या लढ्याला यश
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारतळाच्या प्रश्नावर खंडाळ्यात व्यापारी असोसिएशनच्या लढ्याला यश

या निर्णयामुळे निवेदने, पत्रव्यवहार, बैठका, मोर्चा, टाळे ठोको आंदोलनाचा इशारा व अखेर ठिय्या आंदोलनाने शहर व्यापारी असोसिएशनच्या लढ्याला यश मिळाले. यावेळी खंडाळा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. 

बाजारतळाच्या प्रश्नावर खंडाळ्यात व्यापारी असोसिएशनच्या लढ्याला यश

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : येथील बाजारतळावरच दैनंदिन व आठवडा बाजार भरवावा, यासाठी शहर व्यापारी असोसिएशनने केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. यापुढे पूर्वीपासून ठरवून दिलेल्या बाजारातळावरच बाजार भरवला जाईल, असा ठराव मासिक सभेत घेण्यात आल्याचे नगरपंचायतीचे मुख्यधिकारी योगेश डोके यांनी सांगितले. त्यामुळे अनेक दिवसांपासून असोसिएशनच्या मागणीला अखेर यश मिळाले.
 
शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने राजेंद्र विद्यालयापासून शहराच्या मुख्य रस्त्याने नगरपंचायत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यात महिलांचाही सहभाग होता. या प्रसंगी घोषणाबाजीही करण्यात आली. हा मोर्चा नगरपंचायतीत पोचल्यानंतर बाजारतळावर बाजार भरत नसल्याबाबत अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्ष व मुख्यधिकाऱ्यांनी दैनंदिन व आठवडा बाजार हे यापूर्वी सुचवलेल्या जागी बाजारतळावरच बसवला जाईल, असे जाहीर केले.

महाविकासने आमच्या हिताचा निर्णय घ्यावा; शेतक-यांचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

आठवडा बाजाराची व्याप्ती पाहता मूळ गावठाणातील शहरातील अंतर्गत रस्त्यावर फक्त एका बाजूला बाजार भरवला जाणार. मुख्य रस्ता रहदारीसाठी मोकळा ठेवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मासिक सभेत तसा ठरावही करण्यात आला आहे, असे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवकही उपस्थित होते. या निर्णयामुळे निवेदने, पत्रव्यवहार, बैठका, मोर्चा, टाळे ठोको आंदोलनाचा इशारा व अखेर ठिय्या आंदोलनाने शहर व्यापारी असोसिएशनच्या लढ्याला यश मिळाले. यावेळी खंडाळा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. 

बाजारतळावर बाजार भरविताना सर्व सुोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे बाजारतळावरच बाजार भरवावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. 

- जितेंद्र गाढवे, अध्यक्ष, शहर व्यापारी असोसिएशन, खंडाळा 

शहर व्यापारी असोसिएशनच्या मागणीप्रमाणे गावठाणातील पूर्वीपासून भरत असलेल्या बाजारतळावरच बाजार भरवला जाईल. यासाठी नगरपंचायतीच्या मासिक सभेत विषय मंजूर केला आहे. 

- योगेश डोके, मुख्यधिकारी, खंडाळा

Edited By : Siddharth Latkar

loading image