आता जे काही घडेल, ते सातारा - सांगलीतील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच!

राजेश पाटील | Sunday, 7 February 2021

धरणग्रस्तांनी स्वतःला एकटे समजू नये, तुमच्यासोबत मी आहे. शेवटच्या धरणग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत आपण ताकदीने लढणार आहोत असे नरेंद्र पाटील यांनी आश्वासित केले.  

ढेबेवाडी (जि. सातारा) : जोपर्यंत संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत सातारा व सांगली जिल्ह्यांतील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक होत नाही, तोपर्यंत मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांचा गुंता सुटणार नाही. त्यामुळे तातडीने ही बैठक होण्यासाठी मी प्रयत्नशील असून, त्यात होणाऱ्या निर्णयानंतरच लढ्याची रणनीती ठरवू. धरणग्रस्तांनी त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकत्याच झालेल्या धरणग्रस्तांच्या बैठकीत सांगितले. 

मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नी  मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथे श्री. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जनजागर प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक देवराज देशमुख, संघटक जितेंद्र पाटील, सांगली जिल्हा समन्वयक जगन्नाथ विभूते, जयवंत भोसले, आनंदराव मोहिते, सुरेश पवार, छबुताई मोहिते, सुरेश मोहिते, बापूराव देसाई, अधिक सावंत, तानाजी सावंत आदी धरणग्रस्त प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला.

मेंढ येथील गावठाणातील रखडलेले भूखंड वाटप, माहुली गावठाणात पुनर्वसित होणाऱ्या धरणग्रस्तांच्या नावावर टाकलेल्या लाभ क्षेत्राबाहेरच्या जमिनी आणि त्यांनी सुचविलेले पर्याय, लाभक्षेत्रातील कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांतील जमिनीचा गुंता . सावंतवाडी (जिंती) येथील प्रकल्पग्रस्तांसमोरील प्रश्न, उमरकांचन गावठाणातील नागरी सुविधांची अपूर्ण कामे, भूखंडापासून वंचित कुटुंबांचा प्रश्न आदींबाबत चर्चा झाली. नरेंद्र पाटील म्हणाले, ""धरणाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असतानाही रखडलेली पुनर्वसन प्रक्रिया ही गंभीर बाब असून, तातडीने सर्व प्रश्नांची तड लावणे गरजेचे आहे. मंत्र्यांच्या उपस्थितीत सातारा व सांगली जिल्ह्यांतील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक तातडीने होण्यासाठी मी प्रयत्नशील असून, लवकरच त्यासाठी जलसंपदा व अन्य मंत्र्यांना भेटणार आहे. बैठकीनंतरच पुढची रणनीती आखली जाईल, त्यासाठी धरणग्रस्तांनी सज्ज राहावे.'' 
 
धरणग्रस्तांनी स्वतःला एकटे समजू नये, तुमच्यासोबत मी आहे. शेवटच्या धरणग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत आपण ताकदीने लढणार आहोत. 

Advertising
Advertising

- नरेंद्र पाटील, (संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन)

साताऱ्याच्या पोरानं जिंकलं दिल्लीचं तख्त; यूपीएससीत प्रथमेश देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला!

चुलीवरचे जेवण! सह्याद्रीत आंदाेलनाचा इशारा

शरद पवारांशी चर्चेनंतरच व्यवस्थापनाने आम्हांस प्रतापगड साेपविलाचा संचालक मंडळास पडला विसर!

Budget 2021 : मोदी सरकाराने आज पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशात हात घातला; पृथ्वीराज चव्हाणांचा अर्थसंकल्पावर घणाघात

मारिया आम्हांला माफ कर, आम्हीही सचिन तेंडूलकरला ओळखत नाही

Edited By : Siddharth Latkar