esakal | कांदा निर्यातबंदीविरुद्ध "राष्ट्रवादी' चा थाळीनाद
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा निर्यातबंदीविरुद्ध "राष्ट्रवादी' चा थाळीनाद

कांदा दरात दिवसेंदिवस घसरण होत असताना त्यांनी घेतलेला निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना संपुष्टात आणणारा आहे. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी रद्द करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

कांदा निर्यातबंदीविरुद्ध "राष्ट्रवादी' चा थाळीनाद

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : मोदी सरकार हाय हाय..., शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो..., शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे, कांदा निर्यातबंदीचा निषेध असो... अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी महिलांसह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थाळीनाद करत निषेध नोंदविला.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. या कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तातडीने उठवावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, आदी मागण्यांसह केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज निषेध आंदोलन केले. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थाळीनाद करून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. तसेच कार्यकर्त्यांनी मोदी सरकार व त्यांच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.

भात पीक जोमात, शेतकरी आनंदात; जिल्ह्यात समाधानकारक पाऊस! 
 
यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले, ""मोदी सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार आहे. दुष्काळ, गारपीट, टंचाई अशा निसर्गनिर्मिती विविध संकटांशी मुकाबला करत शेतकऱ्यांनी पोटच्या पोरासारख्या सांभाळलेल्या पिकाला आता कवडीमोल भावाने विकावे लागणार आहे. खटाव, माण, कोरेगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा शेकडो ट्रक कांदा चाळीत पडून आहे. वातावरण बदलल्यामुळे या कांद्याला कोंब येण्याची शक्‍यता आहे. कांदा दरात दिवसेंदिवस घसरण होत असताना त्यांनी घेतलेला निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना संपुष्टात आणणारा आहे. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी रद्द करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

साताऱ्यात घुमला मराठ्यांचा आवाज  

या वेळी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलावडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, स्मिता देशमुख, हणमंत जाधव, अशोकराव जाधव, निवास शिंदे, नलिनी जाधव, पूजा काळे, श्‍वेताली मोहिते, रूपाली भिसे, प्रतीक्षा कदम, मृण्मय जाधव, स्मिता शिंदे, डॉ. सुनीता शिंदे, सुजाता बावडेकर, संगीता तांबे, सुवर्णा पवार, रशिदा शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कुमठ्यात एकाच दिवसात मिनी कोरोना केअर सेंटर सुरू

Edited By : Siddharth Latkar

loading image