राष्ट्रवादीच्या कट्टर नेत्याची 'या' निवडणुकीतून माघार; स्वतः केले जाहीर

सचिन शिंदे | Monday, 27 July 2020

नारायण गावपासून अक्कोलकोट ते पुन्हा कोल्हापूर अशा तब्बल 500 किलोमीटरच्या परिसरात विस्तारलेल्या पुणे पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसमधून सारंग पाटील यांचे नाव अव्वलस्थानी होते. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत केवळ 2500 मतांनी सारंग पाटील यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा याच मतदार संघातून जय्यत तयारी सुरू ठेवली होती. परंतु त्यांनी आज अचानक पुणे पदवीधर मतदार संघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.

कऱ्हाड : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी आज (साेमवार) पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणुक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साताराच्या जनतेने खासदारांवर टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी त्यांच्यासाेबत पुर्ण वेळ कार्यरत राहण्याचा निर्धार सांरग यांनी येथे आॅनलाईन पद्धतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान आपल्या निर्णायबाबत पक्षश्रेष्ठींना कळविल्याचे त्यांनी नमूद केले.
यवतेश्वरचे श्री शंभू महादेव मंदिर

श्री. पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात उच्चांकी मतदार नोंदणी आपण केली आहे. ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणीत आपणच अव्वल क्रमांकावर आहोत. सध्या तीन लाख 12 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 62 हजार मतदारांची नोंदणी मी केलेली आहे. वास्तविक ती नोंदणी मागील नोंदणीपेक्षा चांगली आहे. पाच जिल्ह्यातील 58 मतदारसंघातील मतदारांचा समावेश आहे. अशी स्थिती असताना केवळ सद्सद विवेक बुद्धीला स्मरूण पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत 10 जुलै रोजीच निर्णय झाला आहे. त्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळविलेली आहे. कोरोनाची स्थिती पाहता अधिक काळ ताटकळत राहण्यापेक्षा सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी खासदार पाटील यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे.

Video : व्यापाऱ्यांची 'ही' मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार : पृथ्वीराज चव्हाण

सेना, राष्ट्रवादीच्या दोन गटांत सातारा जिल्ह्यात हाणामारी; 11 जणांना अटक 

केस तर केस आम्ही करणार बिझनेस; साताऱ्याच्या व्यापाऱ्यांची मानसिकता 

ते म्हणाले, फेब्रुवारीपासून कोरोनामुळे स्थिती अत्यंत बिकट आहे. त्या स्थितीचा विचार करून निर्णय घेत आहोत. जून अखेरीस होणाऱ्या निवडणुकीबाबत अद्यापही काहाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यात अधिक गुंतून राहण्यापेक्षा सातारा जिल्ह्यात कार्यरत राहणेच योग्य वाटल्याने माघारीचा निर्णय घेत आहे. निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठी पक्षातून कोणताही दबाव नाही. कोणीही सांगितलेले नाही किंबहुना पक्षात पुणे पदवीधरबाबत कसलीच चर्चा नाही. त्यामुळे पूर्ण विचार करून निर्णय घेत आहे. हा निर्णय पक्षाला कळवून उमेदवारी न देण्याची विनंतही केली आहे. राष्ट्रवादीतून ज्यांना पुणे पदवीधरचा मतदार संघाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाईल. त्यांचा मागे खंबीरपणे उभा राहण्याची भुमिका राहील. माझ्यासोबत पाचही जिल्ह्यात ज्या लोकांनी काम केले आहे. त्या सगळ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेत आहे.

Edited By : Siddharth Latkar 

खासदार श्रीनिवास पाटलांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना धाडले पत्र

तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा