कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावरील रस्त्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; उद्या आंदोलन

विजय लाड
Thursday, 22 October 2020

कऱ्हाड-चिपळूण प्रमुख मार्गावरील घाटमाथा ते पाटण रस्ता दळणवळणासाठी धोकादायक झाला आहे. या प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अनेक वेळा राज्य मार्गावर जीवघेणे अपघात झाले आहेत. या मार्गावरून वाहन चालवणे धोक्‍याचे झाले आहे. राज्यमार्ग खड्डेमुक्त करावा, यासाठी अनेक आंदोलने झाली तरीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

कोयनानगर (जि. सातारा) : कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावरील घाटमाथा ते पाटण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डे भरण्यासाठी चाललेली मलमपट्टी थांबवा, तातडीने रस्त्याचा प्रश्न निकाली काढा, या मागणीसाठी कोयना विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसने शुक्रवारी (ता. 23) कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. 

कऱ्हाड-चिपळूण प्रमुख मार्गावरील घाटमाथा ते पाटण रस्ता दळणवळणासाठी धोकादायक झाला आहे. या प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अनेक वेळा राज्य मार्गावर जीवघेणे अपघात झाले आहेत. या मार्गावरून वाहन चालवणे धोक्‍याचे झाले आहे. राज्यमार्ग खड्डेमुक्त करावा, यासाठी अनेक आंदोलने झाली तरीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. 

माणमधील सहा गावांतील पारंपरिक यात्रा रद्द

रस्ता रुंदीकरणाच्या कामात येराड ते गोषटवाडी दरम्यानच्या रोडलगतच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत. त्याचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना न दिल्यामुळे त्या ठिकाणचे रोड रुंदीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्याची दुरवस्था वाढली आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने चालू करून मार्ग वाहतुकीस तातडीने सुरू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर मेंढेघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब कदम, राम मोहिते, बापू देवळेकर आदींच्या सह्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Agitation For Ghatmatha-Patan Road Tomorrow Satara News