सावधान! लग्न समारंभास 'याच' नातेवाईकांनी उपस्थित रहा, अन्यथा...

उमेश बांबरे | Friday, 10 July 2020

दरम्यान लग्न विधीसाठी दोन दिवसांपूर्वीच्या आदेशात बाहेरच्या जिल्ह्यातील वधू-वरांनाच केवळ लग्न समारंभास उपस्थित राहता येईल, असे नमूद केलेले होत. या विषयावर दै. "सकाळ'ने लक्ष वेधले होते.

सातारा : लग्न समारंभासाठी सातारा जिल्ह्याबाहेरील वधू व वराचे आई-वडील, सख्खे भाऊ, बहिण, सख्खे आजी व आजोबांना उपस्थित राहण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी (ता.9) परवानगी दिली आहे. नव्या आदेशात परजिल्ह्यातील वूध वराचे मामाला मात्र जिल्हाबंदीच राहणार आहे.
शिवेंद्रसिंहराजेंनी का बरं मानले अजित पवारांचे आभार, वाचा सविस्तर
 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुरुवातीला कडक लॉकडाउन राबविला. त्यानंतर शासनाच्या धोरणाप्रमाणे टप्प्याटप्प्याने लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली. काही नियम व अटींवर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रवासासाठी जिल्हाबंदी कायम आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी बससेवा सुरू केली असली, तरी त्यात 20 प्रवाशी घेण्याचीच मर्यादा आहे. दुचाकीवर एक, तीन व चारचाकीवर तिघांना प्रवासाची मुभा होती. मात्र, हा नियम डावलून नागरिकांकडून प्रवास केला जात होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका होता. त्यातच गेल्या काही दिवसांत शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन राबवण्याची आवश्‍यकता होती. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी  नवीन आदेश काढला. नव्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मार्केट आणि दुकाने आता सकाळी नऊ ते दुपारी दाेनपर्यंत सुरु राहतील.

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा

सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे सावट  

दरम्यान लग्न विधीसाठी दोन दिवसांपूर्वीच्या आदेशात बाहेरच्या जिल्ह्यातील वधू-वरांनाच केवळ लग्न समारंभास उपस्थित राहता येईल, असे नमूद केलेले होत. या विषयावर दै. "सकाळ'ने लक्ष वेधले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.9) पुन्हा लग्न समारंभासाठी एक आदेश काढण्यात आला आहे. नव्या आदेशात परजिल्ह्यातील वधू-वरांसमवेत त्यांचे आई, वडील, सख्खे भाऊ, बहिण व आजी, आजोबा यांना उपस्थित राहण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. या लग्न समारंभातही केवळ 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. परंतु लग्न समारंभात वधू वराच्या मामाला उपस्थित राहता येणार नाही. लग्नातील पारंपारिक प्रथेमध्ये मामाची उपस्थिती ही महत्वाची असते.

संपादन सिद्धार्थ लाटकर

नव्या आदेश वाचा, लग्नात लिंबू धरण्यास मामाही उपस्थित राहू शकणार नाही

राजमातांचे वकीलपत्र मागे घे, अन्यथा संपवू : दाेघांची धमकी