केंद्राचे अपयश झाकण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून आरोप : नीलम गोऱ्हे

सत्ताधारी पक्षांवर सतत चुकीचे आरोप केले जात असल्याने या आरोपांना उत्तर देण्याचे काम शिवसेना करत आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे
डॉ. नीलम गोऱ्हे sakal

सातारा : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकासाची धोरणे राबविली जात आहेत. मात्र, केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपचे काही नेते चुकीचे आरोप करत आहे. राज्यातील सरकार उत्तम काम करत असताना विरोधकांच्या आरोपाला प्रत्‍युत्तर दिले जात असल्याचे सांगत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगत पत्रकार परिषदेत भाजपवर टीकास्त्र सोडले.

केंद्र सरकार व राज्य सरकारचा सुसंवाद कमी झाल्याचे सांगून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,‘‘विरोधी पक्षांना महाविकास आघाडीचे चांगले काम दिसत नाही. याचबरोबर केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी भाजपने सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सत्ताधारी पक्षांवर सतत चुकीचे आरोप केले जात असल्याने या आरोपांना उत्तर देण्याचे काम शिवसेना करत आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे
माजी क्रीडामंत्री कबड्डीच्या मैदानात; संजय देशमुखांनी थोपटल्या मांड्या

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कास पठार या पर्यटनाच्या ठिकाणी झालेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती घेणार आहे. या भागातील स्थानिक नागरिक, पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था व पदाधिकाऱ्यांनी उपाययोजना सांगितल्यास त्या दृष्टीने काम करण्यास प्राधान्य देण्यात येईल.’’

दरम्यान, सातारा जिल्ह्यात पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक पर्यटनस्थळे आहेत. या भागांचा विकास करण्यासाठी व पर्यावरण क्षेत्राचा समतोल साधण्यासाठी पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे उत्तम काम करत आहेत. जागतिक तापमानवाढ व प्रदूषण पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणीय बदलामुळे विविध समस्या जाणवत असल्याचे दिसून येत आहे. यामधील प्रामुख्याने प्रदूषण कमी करण्यासाठी गाव ते जिल्हा पातळीपर्यंत विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. विधानसभा सदस्यांनीही स्वत:च्या क्षेत्रात पर्यावरणीय उपक्रम राबविण्यासाठी धोरण आखण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com