Satara crime news : सरपण मागणे पडले महागात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder
सरपण मागणे पडले महागात!

सरपण मागणे पडले महागात!

संशयित कितीही शातीर असला तरी पोलिसांच्या चाणाक्ष नजरा त्याला हेरल्याशिवाय राहत नाहीत. आसले (ता. वाई) येथील युवकाचा खून करून त्याचा मृतदेह जाळणाऱ्या व त्यानंतर तब्बल महिनाभर फरारी टोळीला ‘एलसीबी’च्या पथकाने अटक केली. खुनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सरपण मागणेच टोळीला महागात ठरले. सरपणाचा तोच धागा धरून पोलिसांनी खुनाचा तपास केलाच. त्याशिवाय महिनाभर गुंगारा देणाऱ्या टोळीला पंजाबच्या भटिंडा येथे फिल्मी स्टाइलने गजाआडही केले.

- सचिन शिंदे, कऱ्हाड

हेही वाचा: पंढरपूर न्यायालयाचा निकाल येऊनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही

संशयावरून मित्राचाच काटा काढून त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार आसले येथे मागील वर्षी घडला. बहिणीशी प्रेम प्रकरणाच्‍या संशयावरून गुन्ह्याचा जन्म झाला. वाईतील पाचवड फाट्यापासून युवकाचे अपहरण करून त्याचा खून करणे, त्यानंतर मृतेदह जाळण्याचा प्रकार झाला. भुईंज पोलिसात चार जानेवारी २०२१ रोजी संबंधित युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या वडिलांनी दिली. गुन्हा संशयास्पद असल्याने थेट ‘स्थानिक गुन्हे’चे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी स्वतंत्र पथकाव्दारे तपास केला.

हेही वाचा: फरदळ नको रे भाऊ; गुलाबी बोंडअळी नियंत्रासाठीचा सर्वोत्तम उपाय

संबंधित युवकाचे अपहरण व खुनाची माहिती पोलिसांना मिळाली. तसाच पोलिसांचा तपास सरकत होता. बेपत्ता युवकाला दुचाकीवरून घेऊन जाणारे आहेत, अशीही माहिती पुढे आली. गुन्ह्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘एलसीबी’ने वाई तालुक्यात तळ ठोकला. तपासात त्यांना काही युवक रात्री उशिरा भुईंज परिसरात मृतदेह जाळण्यासाठी सरपण मागत होते, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी त्यातील चौघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी युवकाचा दांडक्याने मारून खुनासह त्याचा मृतदेह जाळल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यात वाई तालुक्यातील कुख्यात गुंडाचाही सहभागाची धक्कादायक माहिती समोर आली. कुख्यात गुंड हा चौघांसह फरार होता. त्याला पकडण्याचे दुसरे आव्हान पोलिसांसमोर होते.

हेही वाचा: रब्बीसाठी उजनीतून शुक्रवारपासून सोडणार पाणी; पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सरपण मागत फिरणाऱ्यांमुळे खुनाची उकल झाली खरी. मात्र, त्यातील कुख्यात गुंडाच्या अटकेचे आव्हान पोलिसांसमोर होते. खुनाच्‍या उकलीनंतर तब्बल दोन महिन्यांनी कुख्यात गुंड सापडला. तोही पंजाबच्या भटिंडामध्ये. तेथेही पोलिसांनी फिल्मी स्टाइलने त्यास अटक केली. कुख्यात गुंड सापडणे मुश्कील होते. त्याकडे मोबाईल होता. त्यावरून तो नेपाळसह पंजाब, राजस्थानात फिरत असल्याचे स्पष्ट झाले होते. पंजाबमध्ये फार काळ वास्तव्यास असतानाच त्याला पकडण्यासाठी ‘एलसीबी’ची टीम रवाना झाली. रमेश गर्जेंसह पाच जणांचे पथक होते. कुख्यात गुंडाचा पाठलाग सुरू होता. दररोज तब्बल १५० किलोमीटरचे अंतर कापत त्याला गाठण्याचे प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा: बाप हा बापच असतो... बिबटयापासून वाचवले पोटच्या गोळ्याला

पोलिस अहोरात्र पाठलाग करत होते. तो सापडत नव्हता. त्याच्याकडे चारचाकी वाहन, मोबाईल, भरपूर पैसेही असून ते चौघे आहेत, अशी अपडेट पोलिसांकडे होती. प्रचंड भूक लागल्याने भटिंडामध्ये ढाबा शोधणाऱ्या पोलिसांना हायवेला लॉजखाली सातारा म्हणजेच ‘एमएच ११’ पासिंगची कार दिसली. पोलिसांना संशय आला. त्यांनी सावध पवित्र्यात हातात शस्त्रे घेत लॉजवर छापा टाकला. त्यावेळी कुख्यात गुंड साथीदारांसह सापडला. ती रात्र तेथेच थांबून दुसऱ्या दिवशी नेपाळला पळण्याच्या तयारीत गुंड असतानाच पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याला गजाआड व्हावे लागले. या गुन्ह्याचा तपास २०२१ मध्ये सर्वोत्तम तपास म्हणून गणला आहे.

Web Title: No Matter How Vicious The Suspect Is The Shrewd Eyes Of The Police Do Not Go Unnoticed Bhatinda Punjab Wai Murder Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..