esakal | ऐन गणेशोत्सवात प्रतापगड परिसरातील २३ गावं अंधारात!
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन गणेशोत्सवात प्रतापगड परिसरातील २३ गावं अंधारात!

महाबळेश्वर हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा, त्यामुळे येथे हाॅटेल व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून छोटे-मोठे उद्योगही इथे बहरात आहेत. मात्र, काही दिवसांपासून या भागात लाईट नसल्याने हाॅटेल व्यवसायालाही फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या लाॅकडाउनमुळे हाॅटेल व्यवसाय बंद असला तरी, येणा-या काळात याचा मोठा परिणाम पर्यटन क्षेत्रालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऐन गणेशोत्सवात प्रतापगड परिसरातील २३ गावं अंधारात!

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : प्रतापगड येथील भागात काही दिवसांपासून दररोज विजेचा लपंडाव सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा फटका सणासुदीच्या काळातही अनुभवायला येत असल्याने प्रतापगड परिसरातील नागरिक हैराण झाले असून त्यांनी सातत्याने होणा-या खंडित वीज पुरवठ्यामुळे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील प्रतापगड परिसरातील २३ गावांना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात वीज सातत्याने खंडित होत आहे. दिवसांतून कधीही वीज पुरवठा खंडित होतो. दररोज संध्याकाळी लाईट जाणे, डिम होणे हे नित्याचेच झाले आहे. रात्री गेलेली लाईट दुरुस्त होण्यासाठी सकाळ उजडावी लागते. पुन्हा लाईट जाते. हे गेल्या काही महिन्यांपासून दररोज सुरु आहे. त्यामुळे नागरिकांत संताप आहे.

मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीसह कॉंग्रेसची फिल्डिंग

सध्या महाबळेश्वरच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. याचेच कारण पुढे करत महावितरणकडून विजेबाबत टाळाटाळ केली जात आहे. कधी पावसामुळे खांब पडला, तर दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे कारण सांगितले जात आहे. याआधीही अशा वारंवार घटना घडल्या असल्या कारणाने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. येथील भागात लाईट नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात या कोरोना विषाणूची भीती, त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्किल बनले असून घरी रहावं तर अंधारातच बसाव लागत असल्याने नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे.

धरणांतील पुराचे पाणी 'या' दुष्काळी तालुक्‍यांना मिळणार ; सातारा सिंचन विभागास यश

महाबळेश्वर हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा, त्यामुळे येथे हाॅटेल व्यवसायला मोठी चालना मिळाली असून छोटे-मोठे उद्योगही इथे बहरात आहेत. मात्र, काही दिवसांपासून या भागात लाईट नसल्याने हाॅटेल व्यवसायालाही फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या लाॅकडाउनमुळे हाॅटेल व्यवसाय बंद असला तरी, येणा-या काळात याचा मोठा परिणाम पर्यटन क्षेत्रालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महावितरणने तातडीने भूमिका घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाचे शस्त्र उपसवावे लागेल, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top