Karad News : 'अजित पवारांना उदघाटनास डावलायचे कारणच नाही' - एकनाथ शिंदे

कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृह उद्घाटनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डावललेले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याविरोधात जाहीरत निषेधही केला आहे.
Ajit Pawar And Eknath Shinde
Ajit Pawar And Eknath ShindeSakal
Summary

कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृह उद्घाटनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डावललेले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याविरोधात जाहीरत निषेधही केला आहे.

कऱ्हाड - कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृह उद्घाटनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डावललेले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याविरोधात जाहीरत निषेधही केला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना शासकीय विश्रामगृहाच्या उदघाटन कार्यक्रमात डावललेले नाही. प्रोटोकॉलप्रमाणे उदघाटन झालेले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेसच्या आमदारांना, नेत्यांना मी सहकार्य करतो. तुम्ही खासगीत विचारले तर विरोधक तुम्हाला माझ्या सहकार्याबद्दल सांगतील, अशी टिप्पनी त्यांनी केली.

कऱ्हाडच्या शासकीय विश्रागृहाचे उद्घाटन आज झाले. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज कऱ्हाडला आले होते. त्यादरम्यान आयोजीत पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवार यांना उदघाटन कार्यक्रमात का डावलले या विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अजित पवार यांना शासकीय विश्रामगृहाच्या उदघाटन कार्यक्रमात डावलेले नाही. प्रोटोकॉलप्रमाणे उदघाटन झालेले आहे. कोणाला डावलायचे कारणच नाही. आता तर मी मुख्यमंत्री आहे. उलट मी राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेसच्या आमदारांना, नेत्यांना सहकार्यच करतो. तुम्ही खासगीत जरी विचारले तर विरोधक तुम्हाला माझ्या सहकार्याबद्दल तुम्हाला सांगतील, असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com