ओबीसींचा राजकारणासाठीच वापर : अरुण खरमाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

obc

ओबीसींचा राजकारणासाठीच वापर : अरुण खरमाटे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने गृहित धरून ओबीसींचा राजकारणासाठी वापर केला आहे. त्या ओबीसी समाजाला आता संघर्ष करावा लागणार आहे. राज्यासह देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी हा एकवटला पाहिजे, असे आवाहन ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक अरुण खरमाटे यांनी केले.

ओबीसी भटक्या विमुक्त जाती, एससी, एनटीच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. कल्याण दळे, संजय विभूते, सुशीला मोराळे, नवीनचंद्र बांदिवडेकर, दादासाहेब काळे, नवनाथ पडळकर, धनंजय बेडदे, धनंजय ओंबासे, प्रदीप वाले, अर्चना पांचाळ, असिफ नदाफ, साधना राठोड, शशिकांत आमणे, नंदकुमार कुंभार, डॉ. विवेक गुरव, नंदकुमार निळकंठ, प्रकाश राठोड, राहुल जाधवर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

श्री. खरमाटे म्हणाले, ‘‘देशासह राज्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावून घेऊन त्यांच्यावर अन्याय केला. त्यासाठी ओबीसींनी लढा उभारण्याची गरज आहे. ओबीसींचे नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ओबीसींचे मोठे संघटन उभे राहत आहे. या संघटनेच्या नवनिर्मितीसाठी येणाऱ्या १५ ते २० दिवसांत नवीन संघटनेची घोषणा होणार आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कऱ्हाडला पहिला विभागीय मेळावा घेतला आहे.

समाजात ओबीसींच्या अनेक संघटना आहेत. मात्र, आता आरपारच्या लढ्यासाठी या संघटनांनी एकत्र आले तरच राजकीय आरक्षण पुन्हा मिळू शकेल.’’ मेळाव्यात ओबीसींच्या प्रश्नांबाबत विविध समस्यांवर, प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

loading image
go to top