esakal | महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद

ग्रामीण भागातील जनमित्रांकडून तयार करण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये इतर ग्राहकांसोबतच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, वाड्या-वस्त्यांमधील काही ग्राहकांचाही समावेश असेल. या ग्रुपद्वारे विविध वीजपुरवठा बंद असल्याचे कारण व सुरू होण्याचा संभाव्य कालावधी, तसेच महावितरणच्या विविध ग्राहक सेवांची व वीज सुरक्षेबाबतची नियमितपणे माहिती दिली जाणार आहे.

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : ग्राहक संवादासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणकडून जिल्ह्यातील 875 ग्रुपद्वारे सुमारे दोन लाख 18 हजार वीज ग्राहकांचा समावेश करण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागात पहिल्या टप्प्यात व्हॉट्‌सअॅपचे सुमारे सात हजार 350 ग्रुप तयार करण्यात येत आहेत. त्याद्वारे सुमारे 18 लाख 37 हजार वीज ग्राहकांशी नियमित संवाद साधणार आहे, अशी माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली आहे. 

पुणे प्रादेशिक विभागातील महत्त्वाच्या व मोठ्या वीजग्राहकांसाठी प्रादेशिक विभाग स्तरावर प्रादेशिक संचालक, परिमंडल स्तरावर मुख्य अभियंत्यांकडून व्हॉट्‌सअॅप ग्रुपद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता ते शाखा अभियंते हे सर्व कार्यालयप्रमुख, तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनमित्रापर्यंत प्रत्येकी एक ग्रुप तयार करण्यात येईल. सातारा जिल्ह्यात एका मंडल कार्यालयासह पाच विभाग, 24 उपविभाग आणि 130 शाखा कार्यालये आहेत. त्यासोबतच प्रत्येक जनमित्रापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे ग्रुप तयार करण्यात येत आहेत.

..अखेर माण तालुक्‍याच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी; युवकांना मोठा दिलासा


सुमारे 875 ग्रुपच्या माध्यमातून दोन लाख 18 हजार वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात येईल. या व्हॉटस्‌अॅप ग्रुपमधील वीज ग्राहकांमध्ये उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसह सर्व वर्गवारीतील ग्राहक, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी, वाणिज्यिक संकुल पदाधिकारी, महत्त्वाचे ग्राहक, लघुउद्योजक संघटना प्रतिनिधी, औद्योगिक वसाहत संघटना पदाधिकारी, एमआयडीसी वाहिन्यांवरील ग्राहकांचा समावेश राहील. 

अजितदादा.. सातारा मेडिकल कॉलेजच्या निधीचं तेवढं बघा

ग्रामीण भागातील जनमित्रांकडून तयार करण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये इतर ग्राहकांसोबतच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, वाड्या-वस्त्यांमधील काही ग्राहकांचाही समावेश असेल. या ग्रुपद्वारे विविध वीजपुरवठा बंद असल्याचे कारण व सुरू होण्याचा संभाव्य कालावधी, तसेच महावितरणच्या विविध ग्राहक सेवांची व वीज सुरक्षेबाबतची नियमितपणे माहिती दिली जाणार आहे. ग्रुपमधील सदस्यांकडून प्राप्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व इतर विविध तक्रारींचे तत्परतेने निवारण करण्यात येईल.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top