esakal | बहिणीवर बलात्कारप्रकरणी पाटण तालुक्‍यातील एकास सक्तमजुरीची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

बहिणीवर बलात्कारप्रकरणी पाटण तालुक्‍यातील एकास सक्तमजुरीची शिक्षा

सरकार पक्षातर्फे खटल्यात पाटण पोलिस ठाण्याचे तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. शिंदे यांनी काम पाहिले.

बहिणीवर बलात्कारप्रकरणी पाटण तालुक्‍यातील एकास सक्तमजुरीची शिक्षा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड : सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्यास एक वर्ष सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी सुनावली. शिक्षा झालेला आरोपी पाटण तालुक्‍यातील आहे. संबंधित आरोपीने पाटण येथे असताना त्याने सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला होता. गेल्या वर्षी याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. 

पाटण पोलिसांनी संशयिताविरोधात येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे महत्त्वाचे सहा साक्षीदार तपासले. न्यायाधीशांनी आरोपीस दोषी धरून या गुन्ह्यासाठी एक वर्ष सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Look Back 2020 : लाचेत महसूल सुसाट; पोलिसांचा नंबर दाेन

कऱ्हाडकरांनाे थांबा! अनोळखी व्यक्तीच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका 

सरकार पक्षातर्फे खटल्यात पाटण पोलिस ठाण्याचे तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. शिंदे यांनी काम पाहिले. हवालदार श्री. आव्हाड, हवालदार श्री. खिलारे, हवालदार श्री. मदने, श्री. माने, श्री. चव्हाण यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

एसपी तेजस्वी सातपुतेंकडून पोलिस निरीक्षकांची पाठराखण? सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार  

loading image
go to top