म्हसवडात सिध्दनाथ-जोगेश्वरी देवीच्या शाही विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी

म्हसवडात सिध्दनाथ-जोगेश्वरी देवीच्या शाही विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी

म्हसवड  (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थान मंदिराचे प्रवेशद्वार लॉकडाउनमुळे तब्बल आठ महिन्यानंतर आज दीपावली पाडव्यास भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

दीपावली पाडव्यास मंदिरात प्रवेश करुन श्रींच्या दर्शनसाठी आतुरलेल्या भाविकांना सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी देऊन दीपावलीची जणू भेटच दिली. यामुळे आज पहाटेपासून श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे, आज दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्रींचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ झाला. या सोहळ्याचा शुभारंभ आज पहाटे मंदिरात श्रींची घटस्थापना करुन करण्यात आला.

त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता श्रींच्या उत्सव मूर्तींना हळदी लावण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास मंदिराचे सालकरी, मानकरी समवेत मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. या शाही विवाह सोहळ्यानिमित्त आज सायंकाळी येथील राज बागेतील श्री म्हातारदेव मंदिरास श्रींच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. मात्र, सायंकाळी फटाक्यांची होत असलेली आतषबाजी रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com