सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पक्षी निरीक्षणाची संधी
व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीने बामणोली कार्यालयाचे वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनीस यांनी नाेंदणीचे आवाहन केले आहे.
कास (जि. सातारा) ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरस्थित कऱ्हाडमार्फत पक्षी सप्ताहानिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दहा, अकरा आणि बारा नोव्हेंबर रोजी पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय व अशासकीय संस्था या सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.
या पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होण्यासाठी रविवार (ता. आठ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाच्या 02164-241711 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच वर्षा सोनवले 9075943910 या व्हॉट्सऍप क्रमांकावर नोंदणी करावी.
औंध : आजी- माजी सैनिक संघटनेचा स्टेट बॅंकेस टाळे ठोकण्याचा इशारा
याबाबतचे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीने बामणोली कार्यालयाचे वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनीस यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar