मुस्लिमांच्या न्यायासाठी संघटना कटिबद्ध | satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडूज : मुस्लिमांच्या न्यायासाठी संघटना कटिबद्ध

वडूज : मुस्लिमांच्या न्यायासाठी संघटना कटिबद्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडूज : मुस्लिम समाजाच्या न्याय व हक्कासाठी ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस संघटना कटिबद्ध राहील, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशिदभाई बागवान यांनी सांगितले.

या ऑर्गनायझेशनच्या वतीने येथे खटाव तालुक्यातील मुस्लिम समाजाचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जरारअहमद बागवान, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दुलभाई सुतार, गुलाब शेख, ॲड. रफिक शेख, मोहंमदखान झारी, मुस्लिम सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष दिलशाद तांबोळी, मुल्ला मशीद ट्रस्टचे सचिव एन. ए. मुल्ला, भरत लोकरे, डॉ. प्रशांत गोडसे उपस्थित होते. या वेळी जिल्हाध्यक्ष बागवान म्हणाले, ‘‘समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजानेही संघटनेच्या पाठीशी राहावे.’’ तालुकाध्यक्ष जाफरअली आत्तार म्हणाले, ‘‘मुस्लिम समाज बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन कटिबद्ध आहे. संघटनेच्या माध्यमातून समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’

हेही वाचा: वाळूज : ढगाळ हवामान आणि अवकाळीमुळे बळीराजा संकटात

या वेळी भरत लोकरे, डॉ. प्रशांत गोडसे, ॲड. रफीक शेख, दिलशाद तांबोळी यांची भाषणे झाली. या वेळी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी जाफरअल्ली आत्तार यांची नियुक्ती करण्यात आली. गुणवंत विद्यार्थी कशनूर शेख, इक्रा आत्तार यांचा सत्कार झाला. प्रारंभी मौलाना तौसीफ रजा यांनी धार्मिक माहिती दिली. मुल्ला मशीद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. रियाज मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. शहानवाझ आतार यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुल्ला मशीद, अहले सुन्नत वल जमाअत, ख्वॉजा गरीब नवाज यंग ग्रुप, केजीएन ग्रुप, रजा ग्रुप, हजरत सिद्धीलाल शाह बाबा उर्स समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

loading image
go to top