माणच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील : सभापती रामराजे

माणच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील : सभापती रामराजे

दहिवडी (जि. सातारा) : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माण तालुक्‍यासाठी दहा सुसज्ज ऑक्‍सिजन बेड दिले आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून हे बेड मिळाले आहेत. 

येथील कोरोना केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात संशयितांची तपासणी व रुग्णांवर उपचार केले जातात. या सेंटरमध्ये विविध साहित्याची कमतरता जाणवत असल्याचे जाणवताच श्री. पवार यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे कोरोना केअर सेंटरला मदत करण्याची विनंती केली. रामराजे यांनी ही विनंती मान्य करून मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी येथील कोरोना केअर सेंटरला दहा सुसज्ज ऑक्‍सिजन बेड दिले. हे बेड श्री. पवार यांच्या हस्ते कोरोना केअर सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ. गोविंद जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 

यावेळी बाजार समितीचे संचालक तानाजी मगर, माजी सरपंच दादासाहेब नवले, दादासाहेब चोपडे, बालाजी जगदाळे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, माण तालुक्‍यासाठी यापुढेही लागेल ती मदत देण्यात येईल, असे आश्वासन सभापती रामराजे यांनी दिले आहे. कोरोना केअर सेंटरसाठी यापुढेही विविध माध्यमातून मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे जिल्हा परिषद सदस्य श्री. पवार यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com