सातारा : परदेशातून जिल्ह्यात आलेल्या 33 प्रवाशांचा ठिकाणा लागेना; प्रशासनाची चिंता

कोरोना व ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
Omicron
Omicron E sakal
Summary

कोरोना व ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

सातारा - कोरोना (Corona) व ओमिक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क (Alert) झाले आहे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात ८८४ नागरिक परदेशातून आले असून, त्यामधील ६०६ जणांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करण्यात आली आहे. दरम्यान, परदेशातून जिल्ह्यात आलेल्या ३३ प्रवाशांचा (Passenger) ठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत परदेशातून आलेल्यांपैकी सहा जण कोरोनाबाधित, तर सहा जण ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

जिल्ह्यात विविध देशांतून आलेल्या परदेशी नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या नागरिकांवर आरोग्य विभागाच्या वतीने लक्ष ठेवले जात आहे. त्यामधील ८५१ नागरिकांची नोंद आढळली आहे. मात्र, ३३ प्रवाशांचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. परदेशातून आलेल्यांपैकी फलटणमधील चौघांना कोरोना, तर पाच जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. खंडाळा येथील एक जण कोरोनाबाधित आढळला आहे.

Omicron
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर

न्यूयॉर्क येथून सातारा येथे आलेली युवती कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर ती ओमिक्रॉनबाधित असल्याचा अहवाल आल्याने सातारकरांची धास्ती वाढली आहे. ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावापासून खबरदारी घेण्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क केला जात आहे. आरोग्य विभाग आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com