कोयनेच्या विकासाचा आराखडा करा ;शंभूराज देसाई

पर्यटन विकास योजनेंतर्गत कामांचा घेतला आढावा
कोयनेच्या विकासाचा आराखडा करा ;शंभूराज देसाई

कोयनानगर: कोयनानगरला पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. येथील पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकरात लवकर तयार करून मंजूर कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. वन्यजीव विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या मंजूर विकासकामांचा आढावा मंत्री देसाई यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांताधिकारी सुनील गाढे, वन्यजीव विभागाचे उपसंचालक उत्तम सावंत, तहसीलदार रमेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, नियोजन समिती सदस्य जयवंतराव शेलार, कोयनेचे उपकार्यकारी अभियंता सागर पाटील, उपअभियंता आशिष जाधव, अशोकराव पाटील, शैलेंद्र शेलार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले,‘‘ कोयना धरण परिसरात पर्यटक वाढावेत, यासाठी चांगली कामे करा. नेहरू उद्यानासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यातून उद्यानातील नवीन कामे हाती घ्यावीत. उद्यानात विविध फुलांची झाडे लावण्यावर भर द्यावा. कोयनानगरला पर्यटन परिचय केंद्र उभे करायचे आहे. त्याचा आराखडा तयार करावा. ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com