कृष्णा नदीकाठी २० हजार झाडांचे रोपण

कऱ्हाड पालिकेचा निर्णय; जमिनीची धूप थांबवण्यासह महापुरापासून संरक्षणासाठी निर्णय
Tree planting
Tree plantingsakal

कऱ्हा़ड : शहरातील कृष्णा नदीकाठावरील होणारी जमिनीची धूप थांबवण्यासह महापुरापासून नागरी वस्तीचे नैसर्गिक पद्धतीने संरक्षण होण्यासाठी पालिकेने त्या त्या भागात तब्बल २० हजार वृक्षांचे रोपण करण्याचा निर्धार केला आहे. माझी वसुंधरांतर्गत हे काम सुरू राहणार आहे. येथील पेंढारकर यांच्या पुतळ्यापासून ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापर्यंतच्या संरक्षक भिंतीपर्यंत वृक्षारोपण होणार आहे. त्यामुळे त्या भागातील जमिनीची धूप थांबणार आहे, त्यासहित चव्हाण यांच्या समाधीसहित प्रीतिसंगम बागेलाही नैसर्गिक संरक्षण मिळणार आहे. वृक्षारोपणामुळे पक्ष्‍यांची आश्रयस्थानेही त्यामुळे वाढून नदीकाठ निसर्गसमृद्ध होण्यास हातभार लागणार आहे.

Tree planting
सातारा : वीजजोडण्या तोडल्याने पिकांचे नुकसान

पालिकेने माझी वसुंधरांतर्गत कृष्णा काठावरील जमिनीची धूप थांबविण्‍यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे.महापुरामुळे कृष्णा नदीकाठावरील जमिनीची धूप थांबविण्यासाठी माझी वसुंधरांतर्गत पालिकेतर्फे नदीकाठावर वृक्षारोपण करण्यात येत आहे. महापुरात वाहून जाणारी माती वृक्षारोपणामुळे टळणार आहे. त्यासाठी २० हजार झाडे लावली जाणार आहेत. त्याची सुरवात झाली आहे.

-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com