esakal | परवानगी न घेता घरपोच भाजी विकणाऱ्या 8 जणांवर कऱ्हाडात कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Karad

परवानगी न घेता घरपोच भाजी विकणाऱ्या 8 जणांवर कऱ्हाडात कारवाई

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कडक लॉकडाउनमध्ये (Lockdown) पालिकेची परवानगी न घेता घरपोच भाजी विकाणाऱ्या आठ विक्रेत्यांची भाजी पालिकेने जप्त केली. विक्रीची परवानगी मागणारे चार भाजी विक्रेते कोरोनाबाधित (Corona) आढळल्याने खळबळ उडाली आहे. (Police Action Against 8 People In Karad Satara News)

किराणासह भाजीपाला घरपोच देण्यासाठी पालिका पास देणार आहे. त्यापूर्वी त्यांची चाचणी सक्तीची केली आहे. त्यानुसार भाजी विक्रेत्यांच्या आज तपासणी झाल्या. कालपासून किराणाचे सहा, तर आज चार भाजी विक्रेते बाधित आढळले आहेत. त्यामुळे घरपोचसाठी साहित्य देणाऱ्यांची तपासणी पालिकेने सक्तीची केली आहे. पालिकेने 80 भाजी विक्रेत्यांची आज तपासणी केली. त्यात चौघे भाजी विक्रेते कोरोनाबाधित आहेत. घरपोच सेवा देणाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची तपासणी सक्तीची केली आहे.

साताऱ्यात मृत्यूतांडव! जिल्ह्यात 24 तासात 58 बाधितांचा मृत्यू, तर 2376 जणांचे अहवाल Positive

त्यातीलच दहा जण बाधित आढळल्याने प्रशासन हादरले आहे. घरपोच किराणासह भाजी विक्रीची परवानगी मागणाऱ्यांची सक्तीने तपासणी केली आहे, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. ते म्हणाले, ""लॉकडाउनच्या काळात किराणा साहित्यासह भाजी घरपोच देणाऱ्यांना पालिका पास देणार आहे. त्यानंतर त्यांना किराणासह भाजीपाला विकता येणार आहे. मात्र, तरीही विनापरवाना घरपोच भाजी विकाणाऱ्या आठ विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केली. त्यांच्या विक्रीस आणलेली भाजी जप्त केली आहे.''

Police Action Against 8 People In Karad Satara News