esakal | कऱ्हाडात कारवाईचा धडाका; विनामास्क फिरणाऱ्या 80 जणांना दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Police Action

कऱ्हाडात कारवाईचा धडाका; विनामास्क फिरणाऱ्या 80 जणांना दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : राज्य सरकारने पुकारलेल्या संचारबंदीला प्रतिसाद न देणाऱ्यांवर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशाही कारवाई केली. त्यासाठी वेगवेगळ्या पाइंटवर पोलिस तैनात होते. त्यात 80 जणांवर कारवाई करताना पोलिसांनी 16 हजारांच्या दंडाची वसुली केली. एक दुकानही सील करण्यात आले आहे.

विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कालपासून कारवाईचा बडगा उगारला. काल दिवसभरात 12 दुचाकी जप्त केल्या होत्या. शहरात येणाऱ्या रस्त्यावर आजही बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे शहरात विनाकारण येणाऱ्यांच्या दुचाकी जप्त केल्या जात होत्या. मास्क नाही त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयेप्रमाणे दंडाची आकरणी केली जात होती. कोल्हापूर, कार्वे कृष्णा नाक्‍यासह महामार्गावरून पंकज हॉटलेमार्गे येणाऱ्यावर आजही कारवाई झाली.

पिंपोड्यात 65 हेक्‍टर पिकांची मोठी हानी; शेतकऱ्यांना अश्रू अनावर

वाहतूक शाखा व पोलिसांनी दिवसभर विना मास्क फिरणाऱ्या 40 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून आठ हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. कोरोनाचे नियम न पाळणारे एक दुकानही सील केले आहे. वाहतूक शाखेने विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या 40 जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आठ हजारांचा दंड वसूल केला आहे. सोशल डिस्टन्सचा नियम न पाळळ्याबद्दल एका व्यापाऱ्यावर दंडाची कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एक हजाराचा दंड वसूल केला आहे.

Edited By : Balkrishna Madhale